फलटणमध्ये महिलांसाठी ‘दांडिया धमाल’; राजे ग्रुप, जायंटस् सहेली व जय तुळजाभवानी ग्रुपचा संयुक्त उपक्रम


स्थैर्य, फलटण, दि. २७ सप्टेंबर : नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून, फलटण शहरातील महिलांसाठी एका भव्य ‘दांडिया धमाल’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राजे ग्रुप फलटण, जायंटस् ग्रुप ऑफ फलटण सहेली आणि जय तुळजाभवानी ग्रुप, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला जात आहे.

हा ‘दांडिया धमाल’ कार्यक्रम मंगळवार, दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून कोळकी येथील अनंत मंगल कार्यालयात होणार आहे.

विशेष म्हणजे, हा कार्यक्रम केवळ २० वर्षांवरील महिला आणि युवतींसाठी मर्यादित ठेवण्यात आला आहे. नवरात्रीच्या या उत्सवात महिलांना मनसोक्त दांडियाचा आनंद घेता यावा, हा यामागील मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांसाठी विविध आकर्षक बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत.

विविध प्रायोजकांच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात फलटण शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!