जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती मार्फत 16 ते 18 फेब्रुवारी पर्यंत त्रुटीपुर्ततेबाबत विशेष मोहिम


दैनिक स्थैर्य । दि.०४ फेब्रुवारी २०२२ । सातारा । जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, साताराकडे  सादर केलेल्या ज्या अर्जदारांना समिती कार्यालयाकडून त्रुटीपूर्ततेबाबत कळविण्यात आले आहे व अद्याप त्रुटी पुर्तता केलेली नाही अशा सर्व अर्जदारांसाठी दि. 16 ते 18 फेब्रुवारी 2022 या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात येणार असून मोहिमेंतर्गत त्रुटींची व कागदपत्रांची पुर्तता करावी, असे आवाहन जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी  समितीच्या अध्यक्षा माधवी सरदेशमुख यांनी कले आहे.

त्रुटींची पुर्तता जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा येथे उपस्थित राहून करावी.


Back to top button
Don`t copy text!