दैनिक स्थैर्य । दि. १७ नोव्हेंबर २०२२ । फलटण । फलटण तालुक्यातील प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत दर तीन महिन्याला रुपये 2000 हे शेतकऱ्यांना जमा होत असतात. परंतु या योजनेचा अर्ज भरला आहे व काही ना काही दुरुस्ती अथवा त्रुटी राहिली आहे. अशा शेतकऱ्यांसाठी फलटण तहसील कार्यालयामध्ये विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी सदरील शिबिरामध्ये सहभाग घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार समीर यादव यांनी केलेले आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे फलटण तालुक्यामधील सहभागी घेतलेल्या शेतकऱ्यांचे दुरुस्तीचे व त्रुटी राहिलेल्या शेतकऱ्यांचे त्रुटी निवारणाचे काम फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, तालुका कृषी अधिकारी सागर डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तरी फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी जर आपल्या त्रुटी राहिल्या असतील तर फलटण तहसील कार्यालयामध्ये धीरज करे 7972095406 यांच्याशी संपर्क साधावा व आपली दुरुस्ती अथवा तुरटी दूर करून घ्यावी, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आलेले आहे.