फलटणमध्ये दिव्यांग मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिर : तहसीलदार समीर यादव

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०७ नोव्हेंबर २०२२ । फलटण । फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग व्यक्तींसाठी फलटण येथे विशेष मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन दि. 12 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत करण्यात आलेले आहे. तरी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग व्यक्तींनी आपले आधार कार्ड व दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन प्रियदर्शनी ज्ञान प्रबोधिनी विधी महाविद्यालय (लॉ कॉलेज, गिरवी नाका, फलटण) उपस्थित रहावे, असे आवाहन फलटणचे तहसीलदार समीर यादव यांनी केलेली आहे.

फलटण विधानसभा मतदारसंघ तथा तहसीलदार फलटण आणि प्रियदर्शनी ज्ञान प्रबोधिनी विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग मतदार नोंदणीसाठी विशेष शिबीर घेण्यात येणार आहे. सदर शिबिरामध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या संघटना यांचे मार्फत 18 वर्षे पूर्ण असलेल्या दिव्यांग मतदार नोंदणी तसेच दुरुस्ती घेण्यात येणार
असून मतदार नोंदणीचे अर्ज स्वीकारले जातील. सदर नोंदणी आणि दुरुस्तीसाठी दिव्यांग मतदारांनी आपले आधार कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र इत्यादी सोबत घेऊन प्रियदर्शनी ज्ञान प्रबोधिनी विधी महाविद्यालय, फलटण (लॉ कॉलेज, गिरवी नाका, फलटण) येथे उपस्थित रहावे असेही तहसीलदार यादव यांनी यावेळी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!