
स्थैर्य, सातारा, दि. 13 नोव्हेंबर : सातारा शहरातील करंजे गाव परिसरातील श्री कालभैरवनाथ आणि जोगेश्वरी देवी मंदिरामध्ये बुधवारी कालभैरव जयंतीनिमित्त विशेष अलंकार पूजा करून देवाला अनोखे रूप देण्यात आले होते. सकाळपासूनच दर्शनासाठी भक्तांनी मंदिर परिसरामध्ये मोठी गर्दी केली होती. (छायाचित्र : अतुल देशपांडे, सातारा)
