
दैनिक स्थैर्य । दि. ०५ मे २०२२ । फलटण । सातारा जिल्ह्यातील फलटण येथे जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांच्या निवासासाठी विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या आदेशानुसार एक कोटी २२ लाख ५१ हजार २८५ रूपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे फलटणला अतिरिक्त सत्र न्यायालय सुरू होण्याचा मार्ग सुकर झालेला आहे.
विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सुमारे १५ दिवसांपूर्वी फलटण येथील न्यायालयाच्या इमारतीची पाहणी केली होती. त्यानंतर फलटण येथे जिल्हा न्यायालय सुरू होण्याची अनेक दिवसांपासूनची मागणी प्रलंबित असल्याचे ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर तातडीने श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी येथे जिल्हा न्यायालय सुरू होण्याबाबत चया अडचणी जाणून घेऊन त्याबाबत संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना बोलावून तातडीने सदरील अहवाल शासनाकडे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शासनाकडे अहवाल सादर झाल्यानंतर फलटण येथे जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांच्या निवासासाठी विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या आदेशानुसार एक कोटी 22 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच पारित करण्यात आलेला आहे.
फलटण येथे जिल्हा न्यायालय व अतिरिक्त सत्र न्यायालय सुरू होण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. याबाबत विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सुमारे पंधरा दिवसांपूर्वी फलटण येथील न्यायालय परिसराची संपूर्ण पाहणी केली होती. त्यानंतर फलटण येथे जिल्हा सत्र न्यायालय सुरू करण्याबाबतच्या अडीअडचणी तातडीने सोडवण्यात येतील, अशी ग्वाही यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली होती. त्यानुसार तातडीने जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांच्या निवासासाठी निधी मंजूर करण्यात आले आहे.