नगराध्यक्षांचे बोलणे म्हणजे आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी अशोक मोने

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


बाजार समितीकडे बोट दाखवून पालिकेतला प्रकार लपणार का?

स्थैर्य, सातारा, दि. 12 : गेल्या तीन वर्षांत सातारा पालिकेत कचर्यावरुन किती खाबूगिरी झाली आणि कोणकोणते उद्योग झाले हे जगजाहिर आहे. पालिकेत भ‘ष्टाचाराने कळस गाठला असून लाचखोरीच्या प्रकारामुळे ऐतिहासिक पालिकेची अब‘ू वेशीवर टांगली गेली आहे. असे असताना पालिकेच्या नगराध्यक्षा बाजार समितीकडे बोट दाखवून पालिकेतील भ‘ष्ट कारभार लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे बोट दाखवून पालिकेत घडलेला लाचखोरीचा प्रकार लपणार आहे का? असा खडा सवाल करतानाच नगराध्यक्षांचे बोलणे म्हणजे आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी असा अजब प्रकार असल्याचा टोला पालिकेचे विरोधी पक्षनेते अशोक मोने यांनी लगावला आहे.

सातारकरांच्या मानगुटीवर साशा नावाचे भूत बसवून कचर्यातून पैशा गोळा करण्याचा ङ्गंडा सत्ताधार्यांनी सुरु केला. गोर गरीब घंटागाडी चालकांच्या पोटावर मारण्याचे प्रकार झाले तर, सातारा विकास आघाडीच्या विशाल जाधव या नगरसेवकामुळे एका घंटागाडी चालकावर आत्महत्या करण्याची दुर्देवी वेळ आली. हे सारे प्रकार कशासाठी आणि कोणासाठी घडले हे सातारकरांनाही कळले आहे. सातारा पालिका म्हणजे भ‘ष्टाचाराचे कुरण झाले असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून धडक कारवाई केली आणि सुरु असलेला भ‘ष्टाचार उघडकीस आणला. प्रशासनावर वचक नाही, अधिकारी कर्मचार्यांच्या मनमानीवर अंकुश ठेवता येत नाही, अशा नगराध्यक्षा केवळ नामधारीच आहेत हे वारंवार सिध्द झाले आहे. लाचखोरीच्या प्रकारानंतर सत्ताधार्यांना तोंड दाखवायला जागा उरली नाही म्हणूनच नगराध्यक्षांनी बाजार समितीकडे बोट दाखवून आपले तोंड लपवण्याचा प्रयत्न केला आहे. नगराध्यक्षा माधवी कदम आणि त्यांच्या बातमीदारांनी वस्तुस्थितीची माहिती करुन मगच बातमी देणे अपेक्षित आहे. बाजार समितीमध्ये लाचखोरीचा प्रकार घडला त्यावेळी कोणीही सत्तेवर नव्हते आणि चेअरमनही कोणी नव्हता. त्यावेळी बाजार समितीवर प्रशासक होते आणि जो प्रकार घडला त्यात न्यायालयाने निकाल दिला असून संबंधीत सचिवाला निर्दोष मुक्तही केले आहे, याची माहिती नगराध्यक्षांनी घ्यायला हवी होती.

दुसरीकडे बोट दाखवून सातारा पालिकेत घडलेला निंदनीय आणि संतापजनक प्रकार लपला जाणार आहे का? अब‘ु वेशीला टांगल्यानंतर पदाधिकारी आणि अधिकार्यांची बैठक घेवून काय ङ्गायदा? साशा कंपनीच्या ठेक्यावरुन पालिकेत झालेला घोडेबाजार आणि त्यासाठी एकमेकांची गचुंडी धरण्याचे प्रकार रोखण्यासाठी दस्तुरखुद्द नेत्यांना लक्ष घालावे लागले होते. तरीही पालिकेतले खाबुगिरीचे प्रकार थांबले नाहीत. आतातर पालिका कार्यालयात ऍन्टीकरप्शनची रेड पडली आणि अधिकारी रंगेहात सापडले. आता अधिकार्यांना नीट वागा अशा सुचना देण्यात आणि स्वत:चे काळे झालेले तोंड लपवण्यासाठी दुसरीकडे रंग ङ्गेकण्यात काय अर्थ आहे? सत्ताधार्यांकडून आणि खास करुन नगराध्यक्षांकडून सातारकरांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र केवळ नामधारी आणि कुचकामी नराध्यक्षांना कटपुतली म्हणून नाचवले गेले आणि त्याही नाचत आहेत, असेच म्हणावे लागेल. घडल्या प्रकारानंतर सत्ताधार्यांचा प्रशासनावर वचक नसल्याचे स्पष्ट झाले असून नाकर्तेपणा लपवण्यासाठीच पालिकेतला प्रकार ठेवायचा झाकून आणि दुसर्या संस्थाकडे बघायचे वाकून असा प्रकार नगराध्यक्षांनी सुरु केला आहे. आपण नीट वागलो असतो तर, प्रशासनही नीट वागले असते, याची जाणीव नगराध्यक्षांनी ठेवायला हवी होती. आता दुसरीकडे बोट दाखवून आणि केविलवाणे तोंड करुन घडला प्रकार लपणार नाही, याचेही भान ठेवावे, असे मोने यांनी म्हटले आहे. सातारा पालिका वेगळी आणि बाजार समिती वेगळी आहे. सातार्यात अनेक संस्था आहेत, हेही नगराध्यक्षांनी लक्षात घेतलं पाहिजे. जिल्हा रुग्णालयातही अनेकदा ऍन्टीकरप्शनची रेड पडते मग त्यालाही मोनेच जबाबदार धरणार का? याचा खुलासाही नगराध्यक्षा कदम यांनी करावा असे आव्हान मोने यांनी दिले आहे.

एवढं मोठं काम आमच्याकडून झालं नाहीमी नगराध्यक्ष असताना अनेक मोठी कामे सातारा शहरात झाली. आता मी पालिकेत विरोधी पक्षनेता म्हणून काम करतो. सातारकरांचा सेवक म्हणून काम करताना आम्ही नेहमीच सत्ताधार्यांच्या चुकीच्या कामाला विरोध केला आणि सातारकरांच्या हिताच्या, चांगल्या कामाला पाठिंबा देण्याचे काम केले आहे. अनेक कामे माझ्या काळात झाली हे खरं आहे आणि नगराध्यक्षांच्या या बोलण्यात तथ्यही आहे पण, ऍन्टीकरप्शनची रेड पडण्याएवढं मोठं काम माझ्याकडून झालं नाही आणि भविष्यातही होणार नाही, असा टोलाही अशोक मोने यांनी लगावला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!