दैनिक स्थैर्य । दि. २४ नोव्हेंबर २०२१ । फलटण । विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे राज्याच्या सर्वोच्च सभागृहाचे सभापती आहेत. तसेच सातारा जिल्ह्यामधील राजकारणाचे खऱ्या अर्थाने किंगमेकर आहेत. सत्ता असो किंवा नसो श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना संपूर्ण राज्यामध्ये राष्ट्रवादीसह इतर पक्षामध्ये सुद्धा मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे शेखर गोरे यांनी टीका करताना तोंड साभाळून टीका करावी, अशी खरमरीत प्रतिक्रिया ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे समर्थक संग्राम अहिवळे यांनी दिलेली आहे.
विधानपरिषदेच्या सातारा – सांगली पंचवार्षिक निवडणूकीत शेखर गोरे हे ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील “लक्ष्मी – विलास” या निवासस्थानी दोन दोन तास वाट बघत होता की, कधी ना. श्रीमंत रामराजे भेटतील ? आणि कधी एकदाचा मी आमदार होईल ? पण आज जिल्हा बॅंकेच्या संचालक पदावर निवडणूकीतून नाही तर चिठ्ठीवर निवडून आले की लगेच डोक्यात हवा गेलेली दिसत आहे. ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी जर ठरवलं तर शेखर गोरे आपण जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा कधीही दिसणार नाही. आपल्या सातारा जिल्ह्याला स्व. यशवंतराव चव्हाण यांची थोर अशी परंपरा आहे. तुम्ही जर तुमची पातळी सोडून टीका केली तर आम्ही सुद्धा शांत बसणार नाही, असेही संग्राम अहिवळे यांनी स्पष्ट केले.