दैनिक स्थैर्य । दि. २४ जून २०२२ । सातारा । प्रकल्प संचालक आत्मा व तालुका कृषि अधिकारी, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे चिंचणेर स निंब येथे सोयाबीन ग्रामबिजोत्पादन व सोयाबीन पिकामध्ये सुर्यफुल आंतरपिक राबविण्याचे 25 एकर क्षेत्रातवर नियोजन याबाबातचे शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन कृषि अधिकारी बीज प्रमाणीकरण सुनिल जाधव यांनी केले.
फुले संगमन, फुले किमया व फुले दूर्वा या सोयाबीन वाणांचे पैदासकार व पायाभूत बियाणे महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी येथून कृषि विज्ञान केंद्र बोरेगाव व तालुका कृषी अधिकारी, सातारा यांच्यामार्फत उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच आंतरपिक सुर्यफुल बियाणे सुद्धा उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. खाद्यतेलातून शेतकऱ्यांना फायदा व्हावा व तेलबियाणे क्षेत्र वाढवे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. हा प्रकल्प जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, उपविभागीय कृषी अधिकारी गुरुदत्त काळे तालुका कृषि अधिकारी हरिश्चंद्र धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.