
स्थैर्य, कऱ्हाड, दि.४ : कऱ्हाड तालुका सहकारी खरेदी-विक्री
संघामार्फत शासन हमीभाव दराने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे.
संघाचे अध्यक्ष रंगराव थोरात यांनी ही माहिती दिली. शेतकऱ्यांनी उत्पादित
केलेले सोयाबीन हमीभाव दराने खरेदी-विक्री संघात घेतले जाईल.
शेतकऱ्यांनी 2020-21 मध्ये सोयाबीन पीक पेरा नोंद असलेला स्वतःचा सातबारा,
आधारकार्ड व राष्ट्रीयीकृत किंवा सहकारी बॅंकेमधील खाते असणाऱ्या ठळक
अक्षरांमध्ये खाते नंबर दिसणाऱ्या पासबुकाची झेरॉक्स, लिंक असलेले आधार
कार्ड या कागदपत्रांची पूर्तता करून कोयना खत कारखान्याशेजारील सेंटरमध्ये
संपर्क साधावा, असे आवाहनही अध्यक्ष श्री. थोरात यांनी केले आहे.