फलटण बाजार समितीत सोयाबीन खरेदी केंद्र कार्यान्वित : सचिव शंकरराव सोनवलकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ०८ नोव्हेंबर २०२४ | फलटण | फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य मार्केट यार्ड, फलटण येथे हमीभाव सोयाबीन खरेदी केंद्र नुकतेच सुरु करण्यात आले. केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किमत खरेदी योजनाअंतर्गत नाफेडमार्फत हंगाम 2024-25 मध्ये सोयाबीन खरेदी साठी नाव नोंदणी सुरू झाली असून ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली नाही त्यांनी मुदतीत नाव नोंदणी करावी; असे आवाहन बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांनी केले आहे.

बाजारामध्ये सोयाबीन शेतमालाचे भाव पडल्याने फलटण तालुक्यातील शेतकऱ्यासाठी सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले असून याकरिता सब एजंट म्हणून फलटण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची निवड करण्यात आली आहे. सोयाबीन या शेतमालाचा हमीभाव 4892/- प्रति क्विंटल असून, कमाल आर्द्रता 12 टक्के आवश्यक आहे. सन 2024-25 च्या 7/12 वर सोयाबीन पिकाची नोंद असणे आवश्यक आहे. सरासरी उत्पादकता विचारात घेता प्रति हेक्टरी 26 क्विंटल सोयाबीन खरेदी केली जाणार आहे.

ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे शेतमाल आणण्याची तारीख कळविण्यात येणार आहे. त्याच दिवशी खरेदी केंद्रावर माल आणावा असे समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांनी सांगितले. हमीभाव खरेदी बाबत अधिक माहिती साठी फलटण तालुका खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक विठ्ठल जाधव मो. 7972417546 व समितीचे क. लिपिक स्वप्नील देशमुख मो. 9860573727 यांचेशी संपर्क साधावा.


Back to top button
Don`t copy text!