दैनिक स्थैर्य | दि. ०९ नोव्हेंबर २०२१ | मुंबई | २०१६ पासून सोन्याची किंमत जवळपास दुप्पट झाली आहे. त्यामुळे वार्षिक परतावा ११ टक्क्यांपर्यंत आला आहे आणि २०२० मध्ये हा परतावा ३० टक्क्यांपर्यंत गेला आहे. काही दशकांपूर्वी सोन्याचे बार आणि दागिने हे सोने खरेदीचे दोनच लोकप्रिय पर्याय होते. परंतु कालानुरूप इतरही अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यात गुंतवणूकदार सोने प्रत्यक्षात धारण करण्याची गरज न पडता सहजपणे सोन्यात गुंतवणूक करू शकतात. यातील एक पर्याय म्हणजे सार्वभौम गोल्ड बॉन्ड्स होय.
या सणांच्या कालावधीत सार्वभौम गोल्ड बॉन्ड्स आणि प्रत्यक्ष सोने खरेदी यांच्यामधूनकशाची निवड करावी याबद्दल मार्गदर्शन करताहेत एंजेल वन लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या.
सार्वभौम गोल्ड बॉन्ड्स म्हणजे काय:
एसजीबी २०१५ मध्ये सोन्याच्या मूल्याचे डेरिव्हेटिव्ह म्हणून आणण्यात आले होते. या बॉन्डसना भारत सरकारकडून पाठिंबा मिळाला असून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून एका आर्थिक वर्षात विविध टप्प्यांमध्ये ते जारी केले जातात. हे बॉन्ड लवचिक असतात आणि त्याचे मूल्य १ ग्रॅम सोन्याच्या मूल्यापासून सुरू होते. विविध ट्रेडिंग खाती, एजंट, निवडक बँका, पोस्ट ऑफिस किंवा शेअर बाजारांद्वारे गुंतवणूकदार या बॉन्ड्समध्ये व्यवहार करू शकतात. गुंतवणूकदाराला किमान एक एकक (एक ग्रॅम) सोने खरेदी करता येते आणि त्याची कमाल गुंतवणूक ४ किलोंपर्यंत जाते.
एसजीबीमधील गुंतवणूक लवचिक आणि सोयीची आहे:
आधी नमूद केल्याप्रमाणे एसजीबी विविध व्यासपीठांवर विविध व्हेंडर्सकडून विकले जातात. ते गुंतवणूक कॉर्पस म्हणून धारण करता येते आणि मित्र तसेच कुटुंबातील सदस्यांना भेट स्वरूपात देता येते. त्यामुळे धनत्रयोदशीचा शुभ शकुन म्हणून लहान प्रमाणात सोनेखरेदी करायची असल्यास एसजीबी हे सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात. त्यामुळे दागिन्यांचा किंवा व्हेंडरकडे उपलब्ध सोन्याच्या नाण्यांचा पर्याय म्हणून गुंतवणूक करण्याचे नियोजन करण्याऐवजी गुंतवणूकदार आवश्यक असलेली रक्कम या पर्यायात पटकन गुंतवू शकतो. हे बॉन्ड डिमॅट स्वरूपात धारण केले जातात आणि त्यामुळे सोने चोरी होण्याची कोणतीही भीती राहत नाही.
एसजीबीमुळे भेसळीशी आणि घडणावळीशी संबंधित समस्या दूर होतात:
भारतात सोन्याला खूप मागणी आहे याबाबत कोणतेही वाद नाहीत कारण हा देश प्रत्यक्ष सोन्याच्या सर्वांत मोठ्या आयातदार देशांपैकी एक आहे. मात्र भेसळीमुळे गुंतवणूकदाराला कायमच सोन्याच्या शुद्धतेबाबत काळजी असते. गुंतवणूकदार पुरेसे दक्ष नसल्यास मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीचे नुकसान होणार हे अशा घटनांमधून दिसून येते. परंतु एसजीबीमुळे अशा प्रकारच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता दूर होते. गुंतवणूकदार गुंतवणुकीच्या मूल्याबाबत तसेच त्याच्या भांडवली सुधारणेबाबत निश्चिंत राहू शकतो. या बॉन्डमधील गुंतवणूक एरवी गुंतवणूकदाराकडून ग्राहकाला प्रत्यक्ष दागिने किंवा इतर कोणतेही सोने खरेदी करत असताना दिल्या जाणाऱ्या घडणावळीपासून मुक्त असते.
एसजीबीवरील कराचे फायदे आणि वाढीचे स्थिर व्याजदर:
या बॉन्डचा एकूण कालावधी आठ वर्षांचा आहे. गुंतवणूकदाराने सदर बॉन्ड पूर्ण कालावधीसाठी धारण केल्यास त्यांना दीर्घकालीन भांडवली फायद्यांतून वगळले जाते. तथापि, या बॉन्ड्सच्या विक्रीवर पाच वर्षांचा लॉक इन कालावधी असतो. याशिवाय या बॉन्ड्सवर वार्षिक २.५ टक्के निश्चित व्याजदर मिळतो आणि तो सहामाही स्वरूपात दिला जातो.
सार्वभौम गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणूक करून साथीच्या काळात बाजारातील गर्दी टाळणे:
सणांचा कालावधी बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दीशिवाय पूर्ण होत नसला तरी सध्याची परिस्थिती मागील काही वर्षांपेक्षा जास्त वेगळी आहे, कारण कोविड-१९ पूर्णपणे गेलेला नाही. विषाणू संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्नशील असलेला एक आरोग्याबाबत जागरूक गुंतवणूकदार म्हणून मोठी गर्दी असलेल्या बाजारपेठा टाळणे हे सर्वोत्तम ठरू शकते. त्यामुळे धनत्रयोदशीचा सण बाधित होणार नाही याची खात्री करण्यासाठी आणि त्याचबरोबर गर्दीच्या बाजारपेठांमध्ये जाण्याची गरज न राहता सोनेखरेदी होईल, हे पाहण्यासाठी एसजीबी हा एक सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.
सार्वभौम गोल्ड बॉन्डमध्ये पद्धतशीर गुंतवणुकीची शक्यता:
गुंतवणूकदार धनत्रयोदशीपासून गुंतवणुकीचा प्रवास सुरू करून एसजीबीमध्ये पद्धतशीर गुंतवणूक करू शकतात. यामुळे पोर्टफोलिओमध्ये वैविध्यपूर्णता येईल आणि गुंतवणूकदाराला आपल्या वित्तीय नियोजनानुसार या बॉन्ड्समध्ये छोट्या छोट्या रकमांची गुंतवणूक करणे शक्य होईल.
थोडक्यात:
एसजीबींनी गुंतवणूक अधिक सहजसाध्य, लवचिक आणि सोयीची बनवली आहे. त्यातून गुंतवणूकदारांना रोखता मिळते. तसेच, विविध व्हेंडर्स आणि अनेक प्लॅटफॉर्म्सद्वारे तिचे वितरण केले जाते. धनत्रयोदशीच्या निमित्ताने सोन्यात काही रक्कम ठेवण्यास इच्छुक असलेल्या गुंतवणूकदारासाठी एसजीबी हा एक उत्तम पर्याय ठरू शकेल. दागिने किंवा सोन्याचा तुकडा खरेदी करण्याचा आनंद ऑनलाइन व्यवहारातून मिळू शकला नाही तरी गुंतवणुकीचा दृष्टीकोन विचारात घेतल्यास प्रत्यक्षात सोने खरेदीपेक्षा हा एक अधिक चांगला पर्याय ठरू शकेल. तसेच जागतिक साथ अद्याप पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. त्यामुळे या गुंतवणुकीच्या पर्यायाचा वापर करून गर्दी टाळणे आणि खरेदी करणे शक्य होईल.