स्थैर्य, सातारा, दि. ३० : पोलीस वर्दी म्हणल्यावर अनेकांच्या डोळ्यासमोर जे चित्र उभे राहते ते वेगळे असते. सातारा पोलीस दलात अनेकजण दर्दी आहेत. त्यापैकी महिला पोलीस पोलीस हेडकॉन्सटेबल संगीता माने याही एक. त्यांनी लॉकडाऊनच्या काळात बंदोबस्ताचा ताण असतानाही असलेला काव्य लेखनाचा नाद सुरू ठेवत लिहलेल्या लावणीचे चित्रपटासाठी ध्वनी मुद्रण पूर्ण झाले आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. पोलीस म्हटल्यावर आडदांड, रागीट, तापट स्वभावाचा असेच काहीसे वेगळे चित्र डोळ्यासमोर उभे राहते.
परंतु सातारा पोलीस दलात काहीजण कवी आहेत, काहीजण लेखक आहेत काहीजण गायक आहेत. अशाच संगीता माने या महिला पोलीस हेडकॉन्सटेबल म्हणून पोलीस मुख्यालय प्रतिनियुक्तीवर बिनतारी संदेश विभागात कार्यरत आहेत. त्यांनी 2016 पासून साहित्य लेखनास सुरवात केली आहे. त्यांच्या अनेक कविताना पुरस्कार मिळाले आहेत. लॉकडाऊनच्या काळात बंदोबस्ताचा ताण असताना त्यांनी त्यांचे लेखन सुरू ठेवले आहे. त्यांच्या बाठ धरला कैरीने या लावणीचे ध्वनी मुद्रण नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे. यशवंत फिल्म प्रोडक्शन निर्मित सगुणा या चित्रपटात त्यांची लिखित लावणी घेण्यात आली आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.