दैनिक स्थैर्य । दि. १४ मार्च २०२२ । मुंबई । वाहतूक शाखेमार्फत वाहनांना करण्यात येणारे टोईंग तसेच नो-पार्कींग झोनच्या वाहनांकरिता लवकरच एक निश्चित अशी कार्यपद्धती (स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) तयार करण्यात येत असल्याची माहिती गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
या एसओपीमुळे टोईंग तसेच नो पॉर्किंग झोनकरिता झालेल्या दंडाबाबत सामान्य माणसाला कळण्यास मदत होईल, असे गृहराज्यमंत्री म्हणाले.
यासंदर्भातील प्रश्न विधान परिषद सदस्य प्रविण दरेकर यांनी विचारला होता.