सोनू संग्राम अहिवळेंच्या प्रचार फेरीला उस्फूर्त प्रतिसाद


स्थैर्य, फलटण, दि. २८ नोव्हेंबर : फलटण नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक २ (अ) मधील वातावरण आता पूर्णपणे तापले आहे. या प्रभागातून अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या सौ. सोनू संग्राम अहिवळे यांना मिळालेल्या ‘दूरदर्शन संच’ (TV) या चिन्हाची सध्या जोरदार चर्चा आहे. आज त्यांच्या प्रचाराचा नारळ फुटला असून, काढण्यात आलेल्या प्रचार फेरीला आणि घरोघरी भेटी दरम्यान (Door to Door) महिला व नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे “यंदा पेठेत टीव्हीच येणार,” अशी चर्चा मतदारांमध्ये सुरू झाली आहे.

प्रचाराचा धडाक्यात शुभारंभ

सोनू अहिवळे यांच्या प्रचारार्थ आयोजित फेरीमध्ये प्रभागातील महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. मंगळवार पेठेतील गल्लीबोळातून काढण्यात आलेल्या या फेरीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. नागरिकांशी संवाद साधताना त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून २००१ साली याच पेठेतून ‘टीव्ही’ चिन्हावर विजयी झालेले अपक्ष उमेदवार आशिष अहिवळे यांच्या विजयाची पुनरावृत्ती होणार, असे बोलले जात आहे.

उच्चशिक्षित नेतृत्वाला मतदारांची पसंती

सोनू अहिवळे या केवळ उमेदवार नसून एक उच्चशिक्षित (B.A. History, pursuing M.A.) आणि राज्यस्तरीय हॉकी खेळाडू आहेत. प्रभागाला एक सुसंस्कृत, शिकलेली आणि खेळाडू वृत्तीची लोकप्रतिनिधी मिळावी, ही मतदारांची इच्छा त्यांच्या प्रचारफेरीतील सहभागावरून स्पष्ट होत आहे. त्यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीचा त्यांना मोठा फायदा होताना दिसत आहे.

‘कामाची माणसं’ म्हणून ओळख

सोनू अहिवळे यांचे पती, संग्राम अहिवळे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. शाळेसाठी पाण्याची सोय, सॅनिटरी नॅपकिन मशीन, रस्ते दुरुस्ती आणि नुकतेच पार पडलेले भव्य ‘भीम फेस्टिव्हल’चे आयोजन यामुळे या कुटुंबाची ‘कामाची माणसं’ अशी ओळख निर्माण झाली आहे. समाजसेवेचा ऐतिहासिक वारसा (नाना अहिवळे) आणि प्रत्यक्ष केलेली विकासकामे यामुळे मतदारांचा कल ‘टीव्ही’ कडे झुकताना दिसत आहे.

मतदारांचा निर्धार

घरोघरी प्रचारादरम्यान महिला मतदार सोनू अहिवळे यांचे औक्षण करून स्वागत करत आहेत. “आमच्या सुख-दुःखात धावून येणाऱ्या आणि उच्चशिक्षित लेकीलाच आम्ही साथ देणार,” असा निर्धार अनेक नागरिकांनी यावेळी बोलून दाखवला.


Back to top button
Don`t copy text!