दैनिक स्थैर्य | दि. ८ जानेवारी २०२५ | फलटण |
सासकल (ता. फलटण) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सोनाली मदने यांची निवड झाली आहे.
सासकल ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या उपसरपंचपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. सरपंच सासकल यांची अध्यासी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, तर निवडणुकीची प्रक्रिया प्रशासकीयद़ृष्ट्या सुरळीतपणे पार पाडण्यासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून एन. बी. नाळे मंडल अधिकारी, कोळकी यांची नियुक्ती करणेत आली होती.
या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत ५ विरुद्ध ४ च्या मताधिक्याने ग्रामविकास गटाच्या नीलम वैभव सावंत यांचा पराभव करून भैरवनाथ पॅनलच्या सोनाली मंगेश मदने या उपसरपंच म्हणून निवडून आल्या. या निवडीमुळे सत्तारुढ गटाच्या केलेल्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य हणमंतराव मुळीक, चांगुणाबाई मुळीक, लक्ष्मीबाई आडके, सोनाली मदने, राजेंद्र घोरपडे, मोहन मुळीक, लता मुळीक, नीलम सावंत व गावच्या सरपंच उषा राजेंद्र फुले उपस्थित होत्या.
यावेळी मंगेश मदने, गोरख मुळीक, दिनेश मुळीक, विनायक मदने,कमलाकर आडके, सुधीर दळवी, तुषार मुळीक, अजित मुळीक, ज्ञानेश्वर मुळीक, ज्ञानेश्वर ह.मुळीक, वाल्मीक मदने, संदीप फडतरे, भीमराव खुडे, रमेश आडके,वैशाली रघुनाथ मुळीक,वैशाली सुनील मुळीक, ताराबाई नामदेव मुळीक, नीलकंठ मुळीक, शंकर गज्याबा मुळीक, शिवाजी मुळीक, दादासो ज्योतिराव मुळीक इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.
या निवडीबद्दल सरपंच उषा राजेंद्र फुले, माजी सरपंच लक्ष्मण ग. मुळीक, सोपान मुळीक, रघुनाथ ग. मुळीक, नीलकंठ मुळीक, किरण घोरपडे, मोहनराव मुळीक (पाटील), दत्तात्रय दळवी, सुनील चांगण यांनी व ग्रामस्थांनी निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या.
४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)