बस कंडकटर चा मुलगा ते संस्थाचालक; सागर आटोळे यांचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २० एप्रिल २०२२ । बारामती ।  एका बस कंडक्टरचा मुलगा तसेच पुण्यासारख्या ठिकाणी M. A.M.ed & DSM चे शिक्षण घेऊन वयाच्या 21 व्या वर्षी सन 2013 मध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कमीत कमी फीमध्ये उच्च दर्जाचे इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे. तसेच मला शिक्षणासाठी जसे गाव सोडावे लागले तसें इतरांना आपले गाव सोडून पुण्यासारख्या ठिकाणी शिक्षणासाठी जावे लागणार नाही या उद्देशाने प्रा. सागर आटोळे यांनी ज्ञानसागर इंग्लिश मिडीयम स्कूल नावाची शाळा सावळ या ठिकाणी सुरु केली.सध्या या संस्थेच्या 4 शाखा आहेत. तसेच एकूण 2000 पेक्षा जास्त विद्यार्थी याठिकाणी शिक्षण घेत आहेत व 150 पेक्षा अधिक शिक्षक व कर्मचारी कार्यरत आहेत. असे कार्य करणारे व्यक्तिमत्व म्हणजे संस्थेचे सर्वेसर्वा आदरणीय सागर आटोळे. शैक्षणिक क्षेत्रात काम करताना सामाजिक बांधिलकीची जोपासना करताना सिमेवर जिवाची बाजी लावणा-या सैनिकाच्या मुलांना शालेय मोफत शिक्षण देणे त्याचप्रमाणे आईवडील नसणा-या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणे असे एक अनेक समाजहिताचे निर्णय संस्थेत घेतले.

जागतिक शैक्षणिक संस्थामधील शिक्षणाचा दर्जा अभ्यासण्यासाठी संस्थापक अध्यक्ष प्रा. सागर आटोळे यांनी जपान, मलेशिया, लंडन या सारख्या वेगवेगळ्या देशातील अनेक शिक्षण संस्थाना भेटी दिल्या. तसेच राजस्थान, गोवा, गुजरात, बंगलोर, कर्नाटक, दिल्ली, हरियाणा,मध्यप्रदेश या राज्यातील नामवंत शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी म्हणून आदर्श शाळा, यंग प्रेसिडेंट, बेस्ट स्कूल, असे विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिले.त्याचबरोबर जागतिक चळवळ असलेल्या स्काऊट गाईड मध्ये एकूण 50 पेक्षा जास्त राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार विद्यार्थ्यांना मिळवून देण्यामध्ये संस्थापक अध्यक्ष सागर आटोळे यांचा सिंहाचा वाटत आहे. त्याचप्रमाणे सन 2018-19 मध्ये स्काऊट गाईड अंतर्गत पंतप्रधान ढाल स्पर्धेमध्ये शाळेतील एकूण 36 विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत उत्कृष्ट कामीगिरी केल्यामुळे राष्ट्रीय स्काऊट गाईड कार्यालयाकडून सन 2021 मध्ये पुणे जिल्ह्यातून एकमेव इंग्रजी माध्यमाच्या शाळेला हा महामही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पंतप्रधान ढाल सुपूर्त करण्यात आली. ती शाळा म्हणजे बारामती तालुक्यातील ज्ञानसागर गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल सावळ.अशा या अतिउत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर 2024 साली दक्षिण कोरिया या ठिकाणी होणाऱ्या जागतिक जांबोरी स्पर्धेसाठी ज्ञानसागर गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल मधील एकूण 8 विद्यार्थ्यांची देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी राष्ट्रीय कार्यलयाकडून शिफारस करण्यात आली. अशा कमी वयात अनेक उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सागर मानसिंग आटोळे यांना आदर्श शिक्षण संस्थाचालक हा राष्ट्रीय दर्जाचा पुरस्कार मा. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. यावेळी सागा फाऊंडेशन चे अध्यक्ष श्री सागर धापटे पाटील,राजमाता कल्पनाराजे भोसले व आदी मान्यवर उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!