
दैनिक स्थैर्य । 27 मार्च 2025। फलटण । येथील टॉक हॉल, भडकमकरनगर याठिकाणी शुक्रवार 4 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता सोमनाथ ज्योतिर्लिग दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्ताने शुक्रवार दि. 4 रोजी सकाळी 11 ते 4 या वेळेमध्ये शिवलिंगाचे दर्शन सर्वांसाठी उपलब्ध आहेत.
याठिकाणी शिवलिंगावर जल अर्पण करता येणार नाही, परंतु अक्षदा, फुल जरूर वाहता येतील. यासाठी जवळून दर्शन घेण्याची व्यवस्था केली जाईल.
हा दुर्मिळ संधीचा उपयोग करावा. अधिक माहितीसाठी 9970342554, 7887472019, 9881485155 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.