सोमीनाथ घोरपडे ‘राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत सत्यशोधक शिक्षक पुरस्कारा’ने सन्मानित

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. 08 डिसेंबर 2021 । फलटण । येथील कमला निंबकर बालभवन शाळेचे उपक्रमशील शिक्षक सोमीनाथ पोपट घोरपडे यांना राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ अंतर्गत प्रोफ़ेसर्स, टीचर्स अँड नॉन टीचिंग एम्प्लॉइज विंग अर्थात प्रोटान संघटनच्या तिसर्‍या महाराष्ट्र राज्य अधिवेशनात ‘राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत सत्यशोधक शिक्षक पुरस्कार’ राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ ट्रेड यूनियन चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सोलापुर प्रोटान अधिवेशनाचे अध्यक्ष मूलनिवासी नायक बामसेफ तथा आरएमबीकेएस नवी दिल्ली चे वामन मेश्राम यांच्या हस्ते सोलापूर येथे प्रदान करण्यात आला.

सोमीनाथ घोरपडे यांचे या पुरस्काराबद्दल कमला निंबकर बालभवनचे मुख्याध्यापक विश्‍वास जगदाळे, साप्ताहिक रामआदेशचे संपादक बापुराव जगताप, मोठे बंधू किरण घोरपडे, अ‍ॅड.रामचंद्र घोरपडे, जन आंदोलन समितीचे अध्यक्ष शिवाजी हरिबा मुळीक, विनायक नारायण मदने, बी.डी घोरपडे, मंगेश मदने, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व माजी सरपंच हणमंतराव मुळीक, लक्ष्मण मुळीक, हणमंतराव मुळीक, सोपन मुळीक(काका), उज्वला किरण घोरपडे, दिपक घोरपडे, अजित मुळीक(पाटील), विष्णू खुडे, दत्तात्रय मुळीक, अर्जुन खुडे, अनिल मुळीक, सुधीर दळवी, भरत अवघडे, नगरसेवक सचिन अहिवळे, प्रमोद राजगुरू, पांडूरंग धाईंजे, राहुल संभाजी मुळीक, दिनेश मदने, अनिल मदने, अरूण मुळीक, शिवाजी शंकर मुळीक, संजय खुडे आदि मान्यवर व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.


Back to top button
Don`t copy text!