दारू पिताना घडलं असं काही. त्याने भोकसून केला खून


स्थैर्य,औरंगाबाद, दि १४: दारू पित असताना पाठीवर थाप मारल्याच्या किरकोळ कारणावरून एका 35 वर्षीय व्यक्तीच्या पोटात धारदार चाकू भोसकून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मीठमिठा तलावाजवळ शनिवारी घडला.तर भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या मयताच्या भाउ गंभीर जखमी आहे.या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मण रघुनाथ चव्हाण वय-35 (रा.मीठमिठा, औरंगाबाद) असे खून झालेल्या मृताचे नाव आहे.तर संजू काळे असे आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, शनिवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास मृत लक्ष्मण व आरोपी संजू सह इतर असे चौघे तालावा जवळ दारू पित बसले होते. दरम्यान संजू हा तेथून उठला असता मृत लक्ष्मण ने त्याच्या पाठीवर थाप मारली.याचा राग संजू ला आला तू मला थाप का मारली असे विचारात तो संतापाने घरी गेला व घरातून एक धारदार चाकू आणून लक्ष्मणवर त्याने वार केले.

आरडाओरड एकूण लक्ष्मणचा भाऊ भीसण हा तेथे भांडण सोडविण्यासाठी आला असता त्यावर देखील आरोपीने वार केले. दरम्यान लक्ष्मण रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळल्याने आरोपी तेथून पसार झाला तर आरोपीची पत्नी उषा व परिसरातील एका व्यक्तीने मोटार सायकल वरून जखमीला घाटी रुग्णालयात दाखल केले.तेथे उपचार सुरू असताना लक्ष्मणचा मृत्यू झाला. या प्रकरणी मायताचा भाऊ भिसन च्या तक्रारीवरून छावणी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत.

आरोपीच्या पत्नीने दिली घाटीत मृतांची खोटी माहिती

आरोपीची पत्नी उषा हिनेच जखमी अवस्थेत लक्ष्मणला घाटी रुग्णालयात दाखल केले होते. दाखल करता वेळी लक्ष्मण घरात टोकदार वस्तूवर पडल्याचे नमूद केले तर नावात देखील बदल केले होते.जेंव्हा डॉक्टरांनी मृत घोषित केले तिच्या पायाखालची वाळू सरकली व मृतदेह सोडून तिने तेथून पलायन केले.


Back to top button
Don`t copy text!