इन्कम टॅक्स रिटर्न्स भरताना होणा-या काही सर्वसाधारण चुका – क्लिअरचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अर्चित गुप्ता

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २९ डिसेंबर २०२१ । मुंबई । मूल्यांकन वर्षातील (असेसमेंट इअर–एई) ३१ जुलै ही वैयक्तिक करदात्यांसाठी टॅक्स रिटर्न्स भरण्यासाठीची अंतिम तारीख आहे. हे काम अगदी शेवटच्या घटकेपर्यंत पुढे ढकलत राहिल्याने आणि मग अखेरच्या क्षणी घाईघाईने उरकल्याने करदात्याकडून चुकीची माहिती उघड केली जाते, ज्याचा रिटर्न्स भरण्याच्या परिणामांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. रिटर्न्स. रिटर्न्स मॅन्युअली किंवा ऑनलाइन अशा दोन्ही प्रकारे भरता येतो. खरेतर आर्थिक वर्ष २०१६-१७ पासून रिटर्न्समध्ये परताव्यासाठीचा दावा केलेला असल्यास किंवा एकूण उत्पन्न रु. २,५०,००० हून अधिक असल्यास टॅक्स रिटर्नचे ई-फायलिंग अनिवार्य करण्यात आले आहे. टॅक्स रिटर्न फाइल करताना करदात्यांकडून सरसकट होणा-या काही चुका पुढीलप्रमाणे:

चुकीचा फॉर्म निवडणे

रिटर्न्स फाइल करण्यासाठी योग्य आयटीआर फॉर्म निवडणे सर्वात महत्त्वाचे आहे. असे न केल्यास तुमच्या अर्जावर आयकर खात्याकडून पुढील प्रक्रिया केली जाणार नाही. आयटीआर फॉर्मची निवड ही उत्पन्नाचे स्वरूप किंवा करदाता कोणत्या गटात मोडतो यानुसार केली जाते. एखाद्या करदात्याने चुकीचा रिटर्न फॉर्म भरल्यास बहुधा खात्याकडून तुम्हाला डिफेक्ट नोटीस मिळेल व ही चूक तुम्हाला निर्धारित कालमर्यादेमध्ये दुरुस्त करावी लागेल

उदाहरण: जर तुम्ही ५० लाखांहून कमी उत्पन्न असणारी आणि भांडवली नफ्यातून कोणतेही उत्पन्न न मिळविणारी व्यक्ती असाल तर आयटीआर-१ हा फॉर्म तुमच्यासाठी योग्य आहे, तर तुमच्या उत्पन्नाचा स्त्रोत बिझनेस किंवा व्यवसाय हा असेल तर तुमच्यासाठी आयटीआर-३ हा फॉर्म योग्य आहे. विविध आयटीआर  फॉर्म्स आणि तुम्ही त्यापैकी कोणता आयटीआर फॉर्म भरायला हवा याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी ClearTax पोर्टलला भेट द्या. ClearTaxसारख्या ई-फायलिंग प्लॅटफॉर्मचा वापर केल्यास तुम्हाला फॉर्म निवडण्यात चूक होण्याची काळजी करावी लागणार नाही, कारण इथे ही निवड सॉफ्टवेअरद्वारे आपणहूनच केली जाते.

चुकीच्या मूल्यांकन वर्षाची निवड करणे

रिटर्न्स फाईल करताना, योग्य एवाय पुरविण्याची खातरजमा करायला हवी. आर्थिक वर्ष (एफवाय) २०१८-१९ साठीचे योग्य मूल्यांकन वर्ष (एवाय)  हे २०१९-२० आहे. चुकीच्या एवायचा उल्लेख केल्यास दुहेरी कर आकारला जाण्याची आणि अनावश्यक दंड बसण्याची शक्यता वाढते.

चुकीची वैयक्तिक माहिती भरणे

आपले नाव, पत्ता, मेल आयडी, फोन नंबर, पॅन, जन्मतारीख यांसारखे अत्यावश्यक वैयक्तिक तपशील रिटर्नच्या ऑफ इन्कमच्या अर्जामध्ये अचूकपणे भरायला हवेत. हे तपशील तुमच्या पॅनवरील तपशीलांबरहुकुम असल्याची खातरजमा तुम्ही करून घ्यायला हवी. तसेच, तुम्ही जर परताव्याचा दावा करण्याचा विचार करत असाल तर तो परतावा ज्या बँकेत जमा व्हावा अशी तुमची इच्छा असेल त्या

बँकेचाखाते क्रमांक, आयएफएससी कोड इत्यादी तपशील अचूकपणे भरण्याची काळजी घ्या, म्हणजे तुम्हाला तुमचा परतावा वेळेत आणि विनासायास मिळेल.

भ्रामक समजूत: टॅक्स आधीच कापला गेला असेल तर रिटर्न्स फाईल करण्याची गरज नाही

मालक कंपन्या आणि बँकांना अनुक्रमे पगार आणि व्याजापोटी मिळणारे उत्पन्न यांच्यावर बसणारा कर अॅट सोर्स म्हणजे उत्पन्नाच्या स्त्रोतापाशी कापून घ्यावा लागतो. तुमचे उत्पन्न २.५ लाख रुपयांहून अधिक असल्यास इन्कम टॅक्स रिटर्न भरणे अनिवार्य असते. आपल्या कोणत्या उत्पन्नावरील टॅक्स कापून घेण्यात आला आहे हे जाहीर करून इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये टीडीएस (स्त्रोतापाशी कापून घेतलेला कर) पोटी पैसे जमा करण्याचा दावा तुम्ही करायला हवा.

भ्रामक समजूत: जर व्याजापोटी मिळालेल्या उत्पन्नावर कर कापला गेला असे तर आयटीआरमध्ये त्याची नोंद करणे गरजेचे नाही.

सर्वसाधारणपणे करदात्यांचे एखादे बचत खाते असते. काही करदात्यांनी बँकांमध्ये मुदतठेवी अर्थात फिक्स्ड डिपॉझिट्स ठेवलेली असतात. अनेक करदाते प्रामुख्याने आपले बचत खाते/फिक्स्ड डिपॉझिट खाते यांचा वापर आपल्या बचतीची साधने म्हणून करता. बँका आणि वित्तीय संस्था खात्यांमधील अशा रकमेवर व्याज देऊ करतात. बँका फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजापोटी जमा केलेल्या रकमेवर लागणारा कर कापतात किंवा टीडीएस लागू करतात. बचतखात्यावरील रकमेवर मिळालेल्या व्याजाला टीडीएस लागत नाही. तरीही बचत खात्यामध्ये जमा करण्यात आलेल्या दोन्ही प्रकारच्या व्याजांच्या रकमा या तुम्हाला इतर स्त्रोतांपासून मिळणा-या उत्पन्नाच्या गटात मोडतात. करदात्यांनी आपले इन्कम टॅक्स रिटर्न्स भरताना व्याजातून मिळणा-या या उत्पन्नाची नोंद करायला हवी. करदात्यांना आपल्या बचतखात्यावर मिळालेल्या व्याजासाठी विभाग  80TTA  अंतर्गत रु. १०,००० पर्यंतच्या वजावटीचा दावा करता येतो. ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत विभाग  80TTA  अंतर्गत  रु. ५०,००० पर्यंतच्या व्याजावर वजावटीचा दावा करता येतो. करदात्यांना आपले इन्कम टॅक्स रिटर्न भरताना कापल्या गेलेल्या टीडीएसच्या परताव्याचा दावाही करता येतो.

उत्पन्नाचे सर्व स्त्रोत उघड न करणे

उत्पन्नाच्या प्रमुख स्त्रोताखेरीज इतर कोणत्याही स्त्रोतापासून तुम्हाला कोणतेही उत्पन्न मिळत असेल तर ते जाहीर करणे अनिवार्य आहे. करदात्यांनी आपल्या बचतखात्यावरील व्याज, फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याज, एखाद्या गृह मालमत्तेच्या भाड्यापोटी मिळालेले उत्पन्न, अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यातून मिळालेले उत्पन्न आणि इतर कोणत्याही स्त्रोतापासून मिळालेले उत्पन्न जाहीर करायला हवे. या उत्पन्न करपात्र असले किंवा नसले तरीही ते जाहीर करणे आवश्यक आहे. अनेक करदाते अज्ञानापोटी करपात्र नसलेल्या उत्पन्नाचे तपशील भरत नाहीत. उदाहरणार्थ, इक्विटी शेअर्स किंवा इक्विटींमध्ये गुंतवणूक करणारे म्युच्युअल फंड्स यांतून लाभलेल्या भांडवली नफ्यातून  capital gains  मिळणा-या १ लाखांपर्यंतच्या उत्पन्नाला करपात्र उत्पन्नातून वगळण्यात येत असले तरीही या भांडवल नफ्याच्या रकान्यामध्ये या उत्पन्नाची नोंद करणे अनिवार्य आहे. असे न केल्यास आय़कर अधिका-यांकडून तुमच चौकशी होऊ शकते.

योग्य तपशील हाती भरताना होणा-या चुका 

आयटीआर फॉर्म्सवर अनेक स्तंभ आणि आडवे रकाने असतात, जे इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्याच्या वेळी भरावे लागतात. यासाठीचे तपगशील विशिष्ट साच्यानुसार भरावे लागतात, आणि हे काम योग्य पद्धतीने न केल्यास रिटर्न भरण्यात चुका होऊ शकतात. उदाहरणार्थ तारीख भरताना ती DD/MM/YYYY या पद्धतीनेच भरावी लागते. जर इतर कोणत्याही प्रकारे तारीख लिहिल्यास रिटर्न्सचा तो अर्ज चुकीचा ठरतो.

टीडीएसला फॉर्म २६एएसशी जोडून न घेणे

आयटीआर भरण्याआधी फॉर्म २६एएस तपासणे महत्त्वाचे आहे. फॉर्म २६एएसमध्ये सर्व उत्पन्नांचे तपशील, स्त्रोतापाशी कापून घेतलेला कर (टीडीएस), तुम्ही आगाऊ भरलेला कर, स्वयंमूल्यांकन कर इत्यादींविषयीच्या तपशीलांचा समावेश असतो. तुमच्या नियोक्त्या कंपनीने कदाचित तुमच्या पगारातून काही कर अॅट सोर्स कापून घेतलेले असू शकतो. नियोक्त्याने जारी केलेल्या फॉर्म १६ मध्ये दिलेले या कापून घेतलेल्या करासंदर्भातील तपशील पगारदार व्यक्तीने फॉर्म २६एएसमधील तपशीलांबरोबर पडताळून घ्यायला हवेत. तुमच्या  Form 26AS मध्ये टीडीएसची नोंद दिसली नाही तर फॉर्म २६एएसमध्ये उल्लेख नसलेल्या वजावटी तुमच्या खात्यात जमा होणार नाहीत. तेव्हा फॉर्म २६एएसमधील माहिती अद्ययावत आणि अचूक असावी याची खात्री करून घेणे हे करदात्याचे कर्तव्य आहे. फॉर्म २६एएस आणि फॉर्म १६ किंवा टीडीएस सर्टिफिकेट्स यांच्यातील नोंदींमध्ये तफावत असल्यास तुम्हाला कमी परतावा मिळण्याची किंवा अधिक कर भरावा लागण्याची शक्यता असते.

दोन किंवा त्याहून अधिक नियोक्त्यांकडून फॉर्म १६ आल्यास

जेव्हा एखादा करदाता नोकरी बदलतो तेव्हा टॅक्स रिटर्न भरण्याच्या वेळी त्यांना प्रत्येक नियोक्त्याकडून स्वतंत्र फॉर्म १६ दिला जातो. एकाहून अधिक फॉर्म १६ चे तपशील असलेले रिटर्न्स फरणे हे गोंधळवून टाकणारे ठरू शकते आणि हे नेमके कसे करावे याबद्दल करदात्यांना निश्चित माहिती नसते. अशावेळी करदात्यांनी आपल्या इन्कम फ्रॉम सॅलरी salary अर्थात पगारातून मिळणा-या उत्पन्नाच्या रकान्यामध्ये दोन्ही ठिकाणहून मिळालेल्या उत्पन्नाची बेरीज करून मांडावी.

नियोक्त्या कंपनीकडून १एचआरए न मिळाल्यास

एखादी व्यक्ती कंपनीच्या आपल्या भाड्याच्या पावत्या एचआर विभागाकडे जमा करत नसेल तर त्याला किंवा तिला घरभाडे भत्ता (एचआरए) मिळू शकत नाही.  HRA benefit  मिळवण्यासाठी घरमालकाच्या पॅनची गरज असते याची माहिती बरेचदा करदात्यांना नसते. करदाते इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करताना HRA पोटी करातून किती सूट मिळू शकते याचा हिशेब करून त्या रकमेच्या वजावटीसाठी

दावा करतायेण्याजोग्या वजावटींचा हिशेब करणे

करदात्यांना विशिष्ट गुंतवणूक आणि खर्चांच्या माध्यमातून एका आर्थिक वर्षामध्ये १.५ लाख रुपयांपर्यंतच्या वजावटींचा दावा claim deductions करण्याची मुभा असते. पण कोणत्या स्त्रोतापासून किती रकमेचा दावा करता येईल हे शोधून काढण्याचे काम अवघड असते. आपले काही खर्च वजावटीसाठी पात्र आहेत याची करदात्यांना बरेचदा माहितीही नसते.

आगाऊ कर/ स्वयंमूल्यांकन कर न भरणे

३१ मार्च ही प्रत्येक आर्थिक वर्षाची अखेरची तारीख असते. व्याज किंवा दंड भरणे टाळायचे असेल तर आपले कर अंतिम मुदतीच्या आधी भरणे योग्य. असे न केल्यास देय रक्कम भरण्याच्या महिन्यापर्यंत दर महिन्याला १% व्याज कापले जाऊ शकते.

भ्रामक समजूत: सर्व देणग्या १०० टक्‍के करसवलतीस पात्र असतात

देणगीपोटी दिलेल्या पैशांमुळे करातून सूट मिळते अशी करदात्यांची एक सर्वसाधारण समजूत असते. मात्र सर्व देणग्या १०० टक्‍के करसवलतीस पात्र नसतात हे तुम्हाला माहीत असायला हवे. काही देणग्याच १०० टक्क्यांपर्यंतच्या करसवतीस पात्र असतात तर काही ५० टक्‍के वजावटीसाठी पात्र असतात. करदात्यांना आयटीआर भरताना देणगीच्या  donation  पावत्यांची पडताळणी करून वजावटीचा दावा करावा लागतो.

भ्रामक समजूत: एनएससीवरील व्याज करमुक्त असते.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी) वर मिळालेले व्याज करमुक्त असते असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकत आहात. हे व्याज पूर्णपणे करपात्र आहे. मात्र विभाग ८०सी अंतर्गत (अखेरचे वर्ष वगळता) सर्व वर्षांसाठी या व्याजाचा तुम्ही वजावटीसाठी दावा करू शकता. ८०सी तील तरतुदीचा लाभ घेण्यासाठी तुम्ही या उत्पन्नाचा उल्लेख आवर्जून‘इतर स्त्रोतांपासून मिळालेले उत्पन्न’म्हणून करायला हवा. अन्यथा तुम्हाला त्यासाठी कर भरावा लागेल.

आयटीआर-५ वेळेवर पाठविता न येणे

आपला इन्कम टॅक्स रिटर्न यशस्वीरित्या ई-फाइल केल्यानंतर कृपया नेटबॅंकिंग, आधार कार्डच्या माध्यमातून किंवा तुमच्या मोबाइल नंबर व ईमेलवरून ईव्‍हीसी प्रक्रियेच्या माध्यमातून तुमचा आयटीआर-५ ई-व्हेरिफाय करून घ्या. आपल्या रिटर्नची पडताळणी करणे महत्त्वाचे आहे, कारण हे व्हेरिफिकेशन मिळाल्यानंतरच आयकर विभागाकडून तुमच्या रिटर्न्सवर प्रक्रिया सुरू होईल. काही कारणांसाठी तुम्हाला तुमच्या रिटर्नला ई-व्हेरिफाय करता आले नाही तर तुम्ही आपल्या आयटीआर-५ वर स्वाक्षरी करून ते केवळ साध्या किंवा स्पीड पोस्टद्वारे सीपीसीला पाठवू शकता. हे काम टॅक्स-रिटर्न फाईल करण्याच्या तारखेपासून १२० दिवसांच्या आत केले जायला हवे.


Back to top button
Don`t copy text!