पत्नीची हत्या केल्यावर सैनिकाची आत्महत्या

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, वर्धा, दि. 02 : पत्नीवर गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर जवानानेही स्वतःवरही गोळ्या झाडून आत्महत्या केली. पुलगाव येथील केंद्रीय दारुगोळा भांडारातील या खळबळजनक घटनेने संपूर्ण वर्धा हादरला आहे.

अजय कुमार सिंग असे आत्महत्या केलेल्या जवानाचे, तर प्रियांका कुमारी असे त्याच्या पत्नीचे नाव आहे. मध्यरात्री पावणे दोन वाजताच्या सुमारास ही भयानक घटना घडली. घरी आल्यानंतर अजय कुमार याने सर्व्हिस गनने पत्नी प्रियांका कुमारीवर गोळ्या झाडल्या. तिच्या हत्येनंतर त्याने स्वतःवरही गोळ्या झाडून आत्महत्या केली. प्रियांकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अजय कुमारला रुग्णालयात नेले असता, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पुलगावच्या केंद्रीय दारुगोळा भांडारामध्ये घडलेल्या या घटनेने खळबळ माजली आहे. अजय कुमार आणि प्रियांका कुमारी हे दोघेही मूळचे बिहारचे आहेत. दोनच वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. त्याने इतक्या टोकाचे पाऊल का उचलले यामागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

मूळचा बिहारचा रहिवासी असलेला अजय कुमार हा जवान वर्ध्यातील पुलगाव केंद्रीय दारुगोळा भांडार येथे कार्यरत आहे. तो ड्युटीवर होता. मध्यरात्री अचानक तो घरी आला. पाणी पिण्याच्या बहाण्याने तो घरी परतला होता. त्यानंतर त्याने इन्सास रायफलने पत्नीवर गोळ्या झाडल्या. यात तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्याने स्वतःवरही गोळ्या झाडून घेतल्या. जखमी अवस्थेत त्याला सावंगी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. त्याने हे कृत्य कोणत्या कारणामुळे केले हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत.

अजय कुमार आणि त्याची पत्नी प्रियांका कुमारी हे दोघेही मूळचे बिहार राज्यातील आहेत. अजय कुमार हा पुलगावच्या केंद्रीय दारुगोळा भांडारमध्ये कार्यरत आहे. त्याची पत्नी प्रियांका ही गरोदर होती. मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास अजय कुमार ड्युटीवरून अचानक घरी आला. पाणी पिण्याच्या बहाण्याने तो घरी आला होता. त्याने रायफलमधून पत्नीवर गोळ्या झाडल्या आणि स्वतःही गोळ्या


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!