महाबळेश्वरातील ५० गावांना सौर पथदिवे

उद्योजक चंदन चव्हाण यांच्याकडून भेट; परदेशात राहूनही मातृभूमीशी नाळ कायम


स्थैर्य, 16 मार्च, सातारा : जिद्द, चिकाटी आणि टाच्या जोरावर सातासमुद्रापार यशाचे खर गाठल्यानंतरही आपल्या मातीशी लेली नाळ कशी जपली जाते, याचे उत्तम उदाहरण दाभे मोहन (ता. महाबळेश्वर) चे सुपुत्र चंदन चव्हाण यांनी घालून आहे. इटलीस्थित यशस्वी उद्योजक असताना सामाजिक बांधिलकीतून क्यातील तब्बल ५० गावांना सौर पथदिवे भेट दिले आहेत.
ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी वस्त्यांवर असलेला अंधार आणि ग्रामस्थांना सुरक्षितता , या उद्देशाने श्री. चव्हाण यांनी विनामूल्य सौर पथदिवे वाटपाचा संकल्प सोडला आहे. त्यांनी आता पर्यंत सुमारे ४० ते ५० गावांमध्ये ४५० हून अधिक आधुनिक सौर पथदिव्यांचे यशस्वी वितरण केले आहे.
जावळीच्या डोंगरदऱ्यात जन्मलेला एक तरुण आज इटलीसारख्या देशात यशस्वी उद्योजक म्हणून नावलौकिक मिळवतो, ही अभिमानास्पद बाब आहे. मात्र, यशाच्या शिखरावर असतानाही आपल्या गावाची ओढ आणि तिथल्या अंधारमय वाड्या-वस्त्यांची चिंता चंदन चव्हाण यांना स्वस्थ बसू देत नाही. केवळ आर्थिक मदत न करता सौरऊर्जेसारखा शाश्वत मार्ग निवडून त्यांनी ग्रामीण विकासाला एक नवी दिशा दिली आहे. “मातृभूमीचे देणे” या भावनेतून सुरू झालेला हा यज्ञ केवळ पथदिव्यांचा नसून तो ग्रामीण भागातील सुरक्षिततेचा आणि विश्वासाचा प्रकाश आहे.
यंदाच्या २०२६ या वर्षातही या उपक्रमाचा पुढील टप्पा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने राबविला जात आहे. यामध्ये दाभेकर,घोणसपूर, गोरोशी, येरणे खुर्द, दरे (जावळी), दुधोशी, खेतेश्वर देवालय पारूट आणि महारोळे या गावांचा समावेश करण्यात आला आहे. परदेशातील व्यस्त कार्यपद्धतीतही आपल्या गावातील दुर्गम भागातील रस्ते उजळावेत, ही त्यांची भावना ग्रामीण विकासासाठी एक आदर्श वस्तुपाठ ठरली आहे.
या उपक्रमांतर्गत सौर पथदिव्यांचे वितरण एक ते १५ एप्रिल या कालावधीत दाभे मोहन येथून केले जाणार आहे. संबंधित गावांच्या ग्रामपंचायत प्रतिनिधींनी किंवाकार्यकत्यांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या गावातील सार्वजनिक ठिकाणी प्रकाशाची सोय करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. समन्वयासाठी दाभे मोहन येथील शैलेश  शिंदे   यांच्याशी संपर्क साधण्याचे सूचित करण्यात आले आहे.
आमच्या जावळीचा सुपुत्र इटलीमध्ये राहूनही आपल्या गावातील अंधाराची दखल घेतो, हे पाहून ऊर भरून येतो. अनेकदा सरकारी योजना पोहोचायला वेळ लागतो; पण चंदनदादांनी स्वतःहून पुढाकार घेऊन ४५० हून अधिक सौर दिवे दिले आहेत. यामुळे रात्रीच्या वेळी महिला, लहान मुले आणि वृद्ध नागरिकांना रस्त्यावरून चालणे सुरक्षित झाले आहे. पर्यावरणपूरक ऊर्जेचा हा वापर इतर उद्योजकांसाठीही प्रेरणादायी ठरेल. अशा दानशूर आणि कर्तव्यदक्ष सुपुत्राचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
– शैलेश शिंदे, ग्रामस्थ, दाभे.

Back to top button
Don`t copy text!