दालवडी येथे रिलायन्स फाऊंडेशन व कृषी विभागातर्फे माती परीक्षण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १० ऑगस्ट २०२४ | फलटण |
रिलायन्स फाऊंडेशन आणि कृषी विभाग सातारातर्फे शेतकर्‍यांसाठी दालवडी, ता. फलटण, जि. सातारा येथे माती परीक्षण कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी प्रास्ताविकात रिलायन्स फाऊंडेशनचे तेजस डोंगरीकर यांनी या वनस्पती निदान शिबिर कार्यक्रमाचा उद्देश आणि मका पीक शेतीशाळा या विषयावर शेतकर्‍यांसाठी रिलायन्स फाऊंडेशनने सुरू केलेले काम याबाबत विवेचन केलेे. तसेच रिलायन्स फाऊंडेशन सध्या शेतकरी व पशुपालक यांच्यासाठी करत असलेल्या कामाबद्दल माहिती दिली. या जिल्ह्यातील शेवटच्या शेतकर्‍यांपर्यंत आणि पशुपालकापर्यंत पोहचून त्याला सर्व माहिती सहज उपलब्ध करून देण्याचे काम करणार असल्याचे संगितले. यासाठी कृषी व इतर विभागाची मदत घेणार असल्याचे सांगितले.

यावेळी संग्राम पाटील, कृषी विज्ञान केंद्र बोरगाव, कृषी विभाग सातारा यांनी मका पिकावरील लष्करी आळी तसेच मका पिकावरती येणार्‍या करपा, कडा करपा रोग आणि बुरशीजन्य रोग व जीवाणूजन्य रोगाचे नियंत्रण कसे करावे. तसेच रोग व किडीचा प्रादुर्भाव होऊ नये याबाबतच्या उपाययोजना याविषयी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. रासायनिक प्रक्रिया न करता घरगुती उपाय करून हुमणी एकात्मिक पद्धतीने कशी कमी करता येईल व इतर पालेभाज्यावर येणारे मावा, किडी, आळी यांचे नियंत्रण कसे करावे, याबाबत शेतकर्‍यांना माहिती दिली. एकात्मिक कीड नियंत्रण करणे याविषयी मार्गदर्शन केले. शेतकर्‍यांसाठी असणार्‍या शासकीय विमा योजना, पीक विमा, पीएम किसान योजना, कृषी यंत्र योजना याविषयी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास १५ महिला शेतकरी उपस्थित होत्या. पिकाविषयी काही अडचणी अथवा प्रश्न असतील तर त्यांनी रिलायन्स फाऊंडेशनच्या मोफत हेल्पलाइन १८००-४१९-८८०० वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!