मलवडीत माती व पाणी परिक्षण कार्यक्रम संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०७ जुलै २०२२ । फलटण ।  फलटण तालुक्यातील मलवडी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत फलटण एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाच्या कृषिदूतांनी ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम या अंतर्गत माती व पाणी परीक्षण शेतीशाळा कार्यक्रम भैरवनाथ मंदिर, मलवडी या ठिकाणी नुकताच संपन्न झाला.

मा.डॉ.प्राजक्ता खरात यांनी मातीचा पोत कमी होत चालेल्या व अनेक माती विषयक प्रश्नांबद्दल या कार्यक्रमात मार्गदर्शन केले.

मलवडीचे सरपंच बाजीराव तरडे, उपसरपंच रज्जाक सय्यद, कृषी सहाय्यक देवराज मदने, कृषी पर्यवेक्षक बेलदार हे सर्व मान्यवर उपस्थित होते.

या वेळी उद्यानदूत दिग्विजय गायकवाड, क्षितिज काकडे, दिग्विजय गोडसे, गौरव कापसे, मयूर जगताप, अर्जुन मांजरे, शुभम कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती.


Back to top button
Don`t copy text!