
दैनिक स्थैर्य । 12 जुलै 2025 । फलटण । निरगुडी, ता. फलटण येथे फलटण एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण अंतर्गत ग्रामीण उद्यानविद्या अनुभव कार्यक्रम 2025-26 अंतर्गत येथील उद्यानकन्या बुशरा तांबोळी, अनुराधा वाघ, संजना निकाळजे, साक्षी शिंदे, शिवांजली कारंडे यांनी माती व पाणी परीक्षणाचा कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी माती व पाणी परीक्षणतज्ञ प्रा.डॉ. प्राजक्ता मेटकरी खरात, सरपंच सौ. कोमल सस्ते, उपसरपंच सौ. सारिका बनसोडे, ग्रामसेवक एन. एस. कदम, सहाय्यक कृषी अधिकारी संजय गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. डॉ. प्राजक्ता मेटकरी-खरात म्हणाल्या, सध्या सर्व ठिकाणच्या मातीचा पोत कमी होत आहे. जमिनीची सुपीकता, सेंद्रिय कर्ब जमिनीचा सामू, सूक्ष्म अन्नद्रव्ये व त्यात विद्राव्य क्षाराचे प्रमाण जपण्यासाठी सातत्याने माती परीक्षण करुन घ्यावे.
उद्यानकन्यांना श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. यु. डी. चव्हाण, कार्यक्रम समन्वयक प्रा. ए. डी. पाटील, कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.जे. व्ही. लेंभे, कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. ए. आर. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. ग्रामसेवक एन. एस कदम यांनी आभार मानले.