आंदरुड येथे उद्यानदूतांकडून माती व पाणीपरीक्षण संवाद सत्राचे आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २२ डिसेंबर २०२४ | फलटण |
आंदरुड, ता. फलटण येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटणमधील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांकडून माती व पाणीपरीक्षण संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी माती परीक्षण व पाणीपरीक्षण महत्त्वाचे का आहे? माती आणि पाणीपरीक्षण केल्याने शेतकर्‍यांना होणारे आर्थिक फायदे कोणते ? याबाबत शेतकर्‍यांना डॉ. प्राजक्ता मेटकरी-खरात यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

गावातील अनेक प्रगतशील शेतकर्‍यांनी या कार्यक्रमास उपस्थिती दाखवली व कार्यक्रमासाठी श्री. भगवतराव पाटील (उपसरपंच आंदरुड), उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, कार्यक्रम अधिकारी डॉ. जे. व्ही. लेंभे व प्रा. ए. डी. पाटील यांचे उद्यानदूत अमृत गायकवाड, आकाश चव्हाण, शुभम भोसले, रोहन भोसले, विराज भामे व रेहान खान यांना उत्तम मार्गदर्शन लाभले.


Back to top button
Don`t copy text!