
दैनिक स्थैर्य । दि. २७ जून २०२२ । फलटण । फलटण तालुक्यातील वडगाव येथे फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी माती व पाणी परीक्षण शेतीशाळा कार्यक्रम आयोजित केला होता. सदरील कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडत वडगाव गावातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीबाबत मार्गदर्शन केले.
सदर शेतीशाळेस माती व पाणी परिक्षण तज्ञ प्रा. डॉ. प्राजक्ता मेटकरी यांनी शेतीशाळेमध्ये मातीचे परिक्षणाचे महत्व, फायदे तसेच मातीसाठी उपयुक्त खतांचा वापर, पाणी परिक्षण यासह विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. एस. डी. निंबाळकर, प्रा. ए. डी. पाटील, प्रा. जे. व्ही. लेंभे, प्रा. ए. एस. शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. शिबिराचे संयोजक उद्यानदुत आशुतोष पवार, अनिकेत जाधव, अतुल सस्ते, अनिकेत सोनवलकर, शुभम म्हेत्रे, वरद कापसे, तन्मय ढगले यांनी मातीविषयक महत्त्व विषद करून माती परीक्षण बद्दल महिती व महत्त्व पटवून दिले.