दैनिक स्थैर्य | दि. ३० जानेवारी २०२४ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषीकन्यांनी ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत माती व पाणी परिक्षणाचा कार्यक्रम आयोजित केला.
या कार्यक्रमाअंतर्गत सोनगाव, ता. फलटण येथील शेतकर्यांना कृषी महाविद्यालय फलटणच्या माती व पाणी परिक्षण तज्ञ डॉ. प्राजक्ता मेटकरी-खरात मॅडम यांनी मार्गदर्शन केले व माती-पाणी परीक्षणाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी कार्यक्रमास गावातील समस्त प्रतिष्ठित ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण सर व श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर, कार्यक्रम अधिकारी स्वप्नील लाळगे सर, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलीमा धालपे मॅडम, कार्यक्रम अधिकारी प्रा. नितीषा पंडीत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीकन्या हर्षल भालघरे, प्रीतल भोसले, प्रेरणा खोपडे, वैष्णवी पिसाळ, भाग्यश्री राऊत, नेहा साळुंखे, नंदिनी शिंदे या कृषीकंन्यानी हा कार्यक्रम पार पाडला.