संगिनी फोरमचे सामाजिक कार्य प्रशंसनीय – सौ. पल्लवी शहा

महिला दिनानिमित्त यशस्वी महिलांचा सत्कार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 9 मार्च 2025। फलटण । संगिनी फोरमचे सामाजिक, सांस्कृतिक कार्य प्रशंसनीय आहे. जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांचा सत्कार करुन महिलांना प्रेरणा देण्याचे मोठे कार्य संगिनी फोरमने केल्याचे प्रतिपादन ज्योतीचंद भाईचंद सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या सौ.पल्लवी शहा यांनी केले.

ज्योतीचंद भाईचंद सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड व संगिनी फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा तसेच राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या 16 महिलांना सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा शिक्षण संस्थेच्या सचिव सौ. वैशालीताई चोरमले, जैन सोशल ग्रुपच्या अध्यक्षा सौ. सविता दोशी, अरिहंत टि.व्ही.एस.च्या सौ.पुजा दोशी, संगिनी फोरमच्या माजी अध्यक्षां सौ. निना कोठारी, विद्यमान अध्यक्षा सौ. अपर्णा जैन, सचिव सौ. प्रज्ञा दोशी, खजिनदार सौ.मनिषा घडिया, उपाध्यक्षा सौ. मनिषा व्होरा, माजी सचिव सौ. दीप्ती राजवैद्य, सौ. पोर्णिमा शहा आदी मान्यवर उपस्थित होते.

महिला दिनानिमित्त सौ.इंदुमती मेहता, सौ.वैशालीताई चोरमले, सौ.मंगल दोशी, सौ. स्मिता शहा, श्रीमती आक्काताई उपाध्ये, सौ. विद्या चतुर, सौ. चांदनी माळवे, सौ. मनिषा नागावकर, जिल्हा समन्वय अधिकारी कु. साक्षी पवार, सौ. अपर्णा गुजराथी, सौ. वैशाली शिंदे, सौ. कल्पना बेडके, कु.साक्षी गायकवाड, सौ. भारती खलाटे, सौ. अर्चना गांधी, प्रा. डॉ सौ. माधुरी दाणी, सौ.संगिता सबसगी यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी सचिव सौ.प्रज्ञा दोशी,खजिनदार सौ.मनिषा घडिया तसेच संगिनी यांचाही सत्कार करण्यात आला. बेस्ट प्रेसिडेंट अवॉर्ड मिळाल्याबद्दल संगिनी अध्यक्षा सौ.अपर्णा जैन यांचा विशेष सत्कार केला. सौ. अपर्णा जैन यांनी प्रास्ताविक केले. सौ.दीप्ती राजवैद्य यांनी सूत्रसंचालन केले. सौ.प्रज्ञा दोशी यांनी आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!