लायन्स क्लब फलटण प्लॅटिनमचे सामाजिक कार्य उत्तम – शिवांजलीराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १९ जुलै २०२३ | फलटण |
‘लायन्स इंटरनॅशलन’ ही जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था ‘वी सर्व्ह’ ब्रीद घेऊन संपूर्ण जगभर मागील १०५ वर्षांपासून सेवाकार्यात अग्रेसर आहे. जगात २१० देशांमध्ये या संस्थेचे सेवाकार्य उत्तम रीतीने सुरू असल्याचे सांगून लायन्स क्लब फलटण प्लॅटिनमच्या माध्यमातून फलटण शहर व परिसरात अत्यंत चांगले सामाजिक कार्य करीत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांनी केले. भविष्यात माझ्या व माझ्या कुटुंबियांच्या वतीने लायन्स क्लब फलटण प्लॅटिनमच्या सामाजिक कार्यास सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

लायन्स क्लब फलटण प्लॅटिनमच्या नूतन अध्यक्षा सौ. वैशाली चोरमले व त्यांच्या पदाधिकार्‍यांच्या पदग्रहण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर पदप्रदान अधिकारी पीएमजेएफ ला. जगदिश पुरोहित, रिजन चेअरमन लायन बाळासाहेब शिरकांडे, झोन चेअरमन एमजेएफ लायन निलम लोंढे-पाटील, प्लॅटिनमच्या मावळत्या अध्यक्षा एमजेएफ लायन सविता दोशी, डिस्ट्रीक्ट सेक्रेटरी लायन राजीव नाईक निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पदप्रदान अधिकारी पीएमजेएफ लायन जगदीश पुरोहित यांनी लायन्स क्लब फलटणच्या अध्यक्षा म्हणून लायन वैशाली चोरमले, सेक्रेटरी ला. ऋतुजा गांधी, खजिनदार ला. सुजाता यादव व त्यांच्या पदाधिकारी मंडळास शपथ देऊन त्या त्या पदाचे महत्त्व व त्याची जबाबदारी विषद केली.

रिजन चेअरमन लायन बाळासाहेब शिरकांडे यांनी नूतन संचालक मंडळाने फलटण शहरातील सामाजिक, शैक्षणिक संस्थांच्या बरोबर वृक्षारोपणाची मोहीम राबविण्यावर भर देऊन जास्तीत जास्त वृक्षारोपण करावे, असे सांगून सर्वांना शुभेच्छा दिल्या.

एमजेएफ लायन निलम लोंढे-पाटील यांनी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर एमजेएफ लायन भोजराज नाईक निंबाळकर यांनी झोन चेअरमन पदाची जबाबदारी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले व नूतन संचालक मंडळास शुभेच्छा दिल्या.
मावळत्या अध्यक्षा एमजेएफ लायन सविता दोशी यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळात सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल आभार मानले.

नूतन अध्यक्षा ला. वैशाली चोरमले यांनी येणार्‍या काळात लायन्स क्लब फलटण प्लॅटिनमच्या माध्यमातून फलटण शहर व तालुक्यात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगून लायन्स क्लब फलटण प्लॅटिनम डिस्ट्रिक्टमध्ये नंबर एकवर नेण्याचा मनोदय व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ला. हेमलता गुंजवटे यांनी केले.

कार्यक्रमास माजी प्रांतपाल एमजेएफ ला. प्रभाकर आंबेकर, डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन एलसीआयएफ एमजेएफ ला. महेश खुस्पे, लायन्स आय हॉस्पिटलचे चेअरमन ला. अर्जुनराव घाडगे, ला. प्रमोद जगताप, ला. विजयकुमार लोंढे पाटील, ला. डॉ. संजीवनी राऊत, ला. डॉ. सौदामिनी गांधी, डॉ. पूनम पिसाळ, डॉ. जनार्दन पिसाळ आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!