युनिव्हर्सिटी लिव्हिंगची सोशल स्कॉलरशिप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १३ जून २०२३ । मुंबई । युनिव्हर्सिटी लिव्हिंग हे आघाडीचे जागतिक स्टुडण्ट हाऊसिंग व्यासपीठ आणि नॉटिंगहॅम ट्रेंट युनिव्हसिटी यांनी समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणत असलेल्या विद्यार्थ्यांना सोशल स्कॉलरशिप्स देण्यासाठी सहयोग केला आहे. ही स्कॉलरशिप नॉटिंगहॅम ट्रेंट युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. समाजाच्या उन्नतीसाठी लक्षणीय सामाजिक परिवर्तनाबाबत योगदान दिलेले विद्यार्थी ५००० युरो मूल्य असलेल्या स्कॉलरशिपसाठी पात्र असतील. या स्कॉलरशिपमध्ये शैक्षणिक शुल्क व निवास शुल्क अशा त्यांच्या खर्चांचा समावेश आहे.

सोशल स्कॉलरशिप उपक्रमाचा भाग म्हणून निवडक पात्र विद्यार्थ्यांना आर्थिक साह्य करण्यात येईल. हा पाठिंबा विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यास आणि आर्थिक तणावाचा अधिक भार न घेता युनिव्हर्सिटी शिक्षणामध्ये सामावून जाण्यास सक्षम करेल. निवासाशी संबंधित आर्थिक आव्हानांचे निर्मूलन करत युनिव्हर्सिटी लिव्हिंगचा विद्यार्थ्यांना त्यांच्या बहुतांश शैक्षणिक प्रवासाचा लाभ घेण्यास सक्षम करण्याचा मनसुबा आहे.

युनिव्हर्सिटी लिव्हिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संस्थापक सौरभ अरोरा म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांना जगाला उत्तम स्थान बनवण्याप्रती योगदान देण्यास प्रेरित करणे महत्त्वपूर्ण आहे. आणि यामध्ये आम्ही प्रोत्साहन देतो तेव्हा त्यामधून विद्यार्थ्यांना योग्य गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. युनिव्हर्सिटी लिव्हिंगमध्ये आम्ही सर्वांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याप्रती कटिबद्ध आहोत. आमच्या सोशल स्कॉलरशिप उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही शैक्षणिक यशामध्ये आर्थिक अडथळ्यांचा सामना करणाऱ्या प्रतिभावान विद्यार्थ्यांना सक्षम करत त्या दृष्टिकोनाला अधिक चालना देण्याच्या समीप पोहोचत आहोत.’’

सोशल स्कॉलरशिप आमच्या मनाच्या खूप जवळ आहेत. आमची विद्यार्थ्यांचे ऋण फेडण्याची, आम्ही त्यांची आणि आमच्यावर त्यांनी दाखवलेल्या विश्वासाची प्रशंसा करतो हे दाखवण्याची इच्छा होती. ग्रेड्स हे पात्रता निकष नसतील, तर विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जागरूकतेचा स्तर महत्त्वाचा असेल. या थोर कार्यामध्ये सक्रियपणे सहभागी असलेल्या आणि परिवर्तनाला चालना देण्यामध्ये साह्य केलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज करण्यासाठी स्वागत आहे, असे ते पुढे म्हणाले.


Back to top button
Don`t copy text!