सोशल पेरेंटींग मुव्हमेंटची शनिवारी बैठक


दैनिक स्थैर्य । 23 मे 2025। बारामती । संविधान विचार मंच, बारामती यांच्यावतीने बारामती शहरामध्ये सोशल पेरेंटींग मुव्हमेंट हा उपक्रम सुरु करण्यात येत आहे. या उपक्रमाची माहिती देणारी बैठक शनिवारी दि. 24 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

शहरातील शैक्षणिक वातावरण टिकवून ठेवणे, सामाजिक पालकत्वाची भावना रुजविणे, , विद्यार्थ्यांना गुन्हेगारी तसेच व्यसनांपासून लांब ठेवणे, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या वाटेवर येणारे अडथळे दूर करणे या उद्दिष्टाने हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. सर्व पालकांना या उपक्रमात सभासद करून घेतले जाणार आहे. हा उपक्रम प्रत्यक्षात कशा पद्धतीने राबविला जाईल याची माहिती या बैठकीतून दिली जाणार आहे. मार्केटयार्ड चौकाजवळ देवकाते हॉस्पीटलच्या मागील बाजूस पाण्याच्या टाकीजवळ नव्याने तयार झालेल्या मल्हार क्लबमध्ये या बैठकीचे आयोजन केले गेले आहे.

या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा आहे अशा सर्वांनी या बैठकीसाठी उपस्थित रहावे अशी विनंती संयोजकांनी केली आहे. अधिक माहितीसाठी राजेश कांबळे , 9112240045, घनश्याम केळकर – 9881098138, मोहन गायकवाड – 9922415137 यांच्याशी संपर्क साधावा.


Back to top button
Don`t copy text!