सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची एलईडी व्हॅनद्वारे होणार गावोगावी प्रसिद्धी, पालकमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवून केले मार्गस्थ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.१८: अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील लोकांना त्यांच्यासाठी शासन राबवित असलेल्या योजनांची माहिती व्हावी यासाठी शासन विविध माध्यमांचा वापर करुन प्रसिद्धी करीत आहे. याचाच भाग म्हणून जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने एलईडी व्हॅनच्या माध्यमातून योजनांची प्रसिद्धी करण्यात येत आहे. या योजनांची माहिती घेऊन लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने अनुसूचित जाती उपयोजनेमधून सामाजिक न्याय विभागाकडील योजनांची प्रसिद्धी व्हॅनद्वारे करण्यात येत आहे या व्हॅनला पालकमंत्री श्री. पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा नियोजन अधिकारी बी.जे. जगदाळे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील आदी उपस्थित होते. जिल्ह्यात कोरोना संसर्गामुळे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत आहे. या व्हॅनच्या माध्यमातून कोरोना पासून कसा बचाव करावा याचीही माहिती देण्यात येणार आहे. शासनाने व प्रशासनाने दिलल्या नियमांचे नागरिकांनी पालन करुन सहकार्य करावे असे सांगून हा जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम स्तुत्य असून या उपक्रमाला शुभेच्छाही पालकमंत्री श्री. पाटील यांनी शेवटी दिल्या.


Back to top button
Don`t copy text!