
दैनिक स्थैर्य । दि. २८ जून २०२३ । पुणे । सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सहायक आयुक्त,समाज कल्याण ,पुणे तर्फे लोकराजा छत्रपती शाहु महाराज यांच्या १४९ व्या जयंती निमित सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करताना राजीव गांधी ई.लेर्निग स्कूल ते श्री.शाहू मंदिर महाविधालय समता रॅली काढून सकाळी ८.३० ते १० माझा देश नशामुक्त करण्यासाठी मुलांनी चौकाचौकात जन प्रबोधन करीत त्यावर व सामाजिक परिवर्तनाची गीते कर्वे समाज सेवा संस्था ,पुणे चे मुलांनी गीते सादर केली.
तर ह.भ.प.सौ.स्नेहल जाधव पायगुडे यांनी राजर्षी शाहूमहाराज यांच्या जीवनावर पोवाडा गाऊन वेगळेच वातावरण तयार केले.तर प्रेक्षक म्हणून सहभागी झालेले विश्वास बनसोडे यांनी मुलांचा सहभाग पाहून त्यांनी देखील स्वरचित बुध्द फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ संत कबीर यांच्या कार्यावर प्रेरणादायी गीत गाऊन मुलांचा उस्ताह वाढविला. या समता रॅली मध्ये नागरी हक्क संरक्षण ,समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य चे उपायुक्त रविंद्र कदमपाटील,समाज कल्याण सहायक आयुक्त कैलास आडे,व्यसनमुक्ती समाज कल्याण स.आयुक्त हरिश डोंगरे उपस्थीत होते. या ररली मध्ये शाहू कॉलेज चे NCC चे विध्यार्थी ,कर्वे संस्थेचे तसेच पी.व्ही.जी. कॉलेज चे विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
शाहू मंदिर महाविद्यालय पर्वती या ठिकाणी समारोप करताना माननीय रवींद्र कदम पाटील उपायुक्त यांच्या शुभहस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास भव्य पुष्पहार अर्पण करण्यात आला तर याप्रसंगी हरीजी डोंगरे यांनी विध्यार्थाना व जनतेला नशामुक्त भारत अभियानांतर्गत शपथ देऊन स्वतःपासून याची सुरुवात करण्याचे आवाहन केल.यावेळी रविंद्र कदम पाटील आणि कैलास आडे साहेब यांच्या शुभ हस्ते फुले एज्युकेशन च्या वतीने शाहीर सौ.स्नेहल जाधव पायगुडे ,विश्वास बनसोडे ,कर्वे चे ठाकूर सर शर्मिला ताई यांचा समता रॅली साठी भरीव योगदान दिले म्हणून महात्मा फुले गीत चरित्र व ज्ञान्जोती सावित्रीबाई फुले ग्रंथ आणि शाल देऊन यथोचीत सन्मान केला . या समता रॅली साठी समाज कल्याण अधिकारी मल्लिनाथ हरसुरे ,गोपीचंद आल्हाट ,अर्चना होले, महेश गवारी, वैभव लव्हे तसेच फुले एज्युकेशनचे अध्यक्ष व पीव्हीजी कॉलेजचे सत्यशोधक रघुनाथ ढोक,हनुमंत सावंत , ओबीसीचे जेष्ठ कार्यकर्ते शरद ताजणे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे शेवटी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती देत ठाकूर सर यांनी आभार मानले.