जिल्हा परिषद शिक्षकांनी जपली सामाजिक बांधिलकी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण दि. २२ : सातारा जिल्हा परिषदेच्या निंबळक केंद्रातील शिक्षकांच्यावतीने सामाजिक बांधिलकीचे भान जपत जिल्हा परिषदेच्या मिंडवस्ती शाळेतील सहकारी शिक्षीका श्रीमती विजया राजेंद्र धुमाळ यांना फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर व गटविकास अधिकारी सौ.अमिता गावडे यांच्या हस्ते ‘कोरोना मदत निधी’ सुपूर्द केला.

जिल्हा परिषदेचे शिक्षक राजेंद्र धुमाळ यांचे काही दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा होवून निधन झाले होते. त्यामुळे आपल्या सहकारी शिक्षीका श्रीमती विजया राजेंद्र धुमाळ यांच्या कुटूंबियांना आधार देण्याच्या सामाजिक भावनेतून जिल्हा परिषद निंबळक केंद्रातील शिक्षकांच्यावतीने ही मदत देण्यात आली.

यावेळी फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, उपसभापती सौ.रेखाताई खरात, माजी सभापती वसंतकाका गायकवाड, सौ.प्रतिभाताई धुमाळ, सदस्य संजय कापसे, सचिन रणवरे, सौ.विमलताई गायकवाड, सौ.सुशिलाताई नाळे, गटविकास अधिकारी डॉ.अमिता गावडे, श्री.खरात, जि.प.शाळा मिंडवस्तीचे मुख्याध्यापक लक्ष्मण गुंजवटे, माजी मुख्याध्यापक ठिगळे, राजाळे सर्कलचे मुख्याध्यापक मोरे, विठ्ठल मुळीक, आढाववस्ती शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.रुपाली धुमाळ, कापसेवस्ती शाळेचे मुख्याध्यापक जितेंद्र कदम, तरटेवस्ती शाळेच्या मुख्याध्यापिका सौभारती धुमाळ, निंबळक शाळेचे विषयक शिक्षक रविंद्र जंगम, यादववस्ती शाळेच्या उपशिक्षिका सौ.मेघा यादव, शेरेचीवाडी शाळेचे प्रविण क्षिरसागर आदींची उपस्थिती होती.


Back to top button
Don`t copy text!