शिवजयंती निमित्त सामाजिक प्रबोधन ही काळाची गरज: सुनेत्रा पवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २० फेब्रुवारी २०२३ । बारामती । छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार डोक्यावर घेऊन न नाचता,विचार मनात व डोक्यात घेऊन आचरणात आणणे व या साठी कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करणारे कार्यक्रम शिवजयंती निमित्त होणे ही काळाची गरज असल्याचे मत बारामती हाय टेक टेक्स्टाईल पार्क च्या अध्यक्षा सुनेत्रा पवार व्यक्त केले.

शिवजयंती उत्सव देसाई इस्टेट च्या वतीने ह.भ.प. आशीष काटे महाराज यांचे ‘छत्रपती विचार व आजची गरज’ या विषयावर कीर्तन चे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी सुनेत्रा पवार यांनी मत व्यक्त केले या वेळी शहर अध्यक्ष जय पाटील, युवक अध्यक्ष अविनाश बांदल, मा. नगरसेवक अमर धुमाळ , विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचे कार्यालय अधीक्षक हनुमंत पाटील व आयोजक अतुल बालगुडे, राहुल वायसे संग्राम भैय्या खंडागळे ,अमोल पवार, अनिल धनंजय आटोळे, सुशील जगताप ,अनिल खंडाळे, निलेश पवार व इतर मान्यवर उपस्तीत होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती डी. जे. लावून व मिरवणूक समोर नाचून साजरी न करता बालवयात शिवविचार कळावेत व जीवनात आचरण करता यावे म्हणून सामाजिक भान ठेवून प्रभोधन करणारे कार्यक्रम व्हावेत व ही गरज ओळखून देसाई इस्टेट परिवाराने आयोजित केलेला कार्यक्रम आदर्शवत असल्याचे ह.भ.प.काटे महाराज यांनी सांगितले.

या पूर्वी कोरोना काळातील अनाथ मुलांना शैक्षणिक मदत, वृक्षारोपण,रक्तदान यानंतर सामाजिक प्रोबधन करणारे कीर्तन आयोजन करून समाज्याचे ऋण फेडत असल्याचे आयोजक मा. नगरसेवक अतुल बालगुडे यांनी सांगितले. रांगोळी च्या माध्यमातून शिवाजी महाराज जीवन पट काढणारे चैतन्य शेलार यांचा सत्कार सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले तर आभार विनीत ठोंबरे यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!