
दैनिक स्थैर्य । दि.२१ मार्च २०२२ । फलटण । वय वर्ष 21, खरं तर भीतीच वाटत होती , आणि आनंद ही होत होता … कारण प्रथमच रक्तदान करत होतो . कॉलेज चा एन.एस.एस. कॅम्प होता . सर्व मित्र रक्तदान करणार होते . त्यामुळे माझे ही हे कर्तव्य आहेच की असे समजून मनात पक्कं ठरवले आज करायचे रक्तदान ….. आणि त्या पूर्वी स्वतःला रक्त कमी व वजनही जेमतेम चाळीस – पंचेचाळीस त्या मुळे इच्छा असूनही शरीरातील कमतरतेमुळे या पूर्वी कधी रक्तदान नाही करता आले पण आता ते आता शक्य झाले आणि केले प्रथम रक्तदान……
त्यांसाठी कॉलेज कॅम्प मध्ये असणारे जगदाळे सर आणि पवार सरांनी प्रोत्साहन दिले व सांगितले की रक्तदान हेच सर्व श्रेष्ठ दान आहे . कारण शरीरातील सर्व पार्ट कंपनीत बनवता येतील परंतु रक्त बनवता येत नाही . ते इतर व्यक्तीकडूनच मिळते. त्या साठी सर्व शरीर सुदृढ असेल तरच आपण रक्तदान करू शकतो.
त्यानंतर दरवर्षी एकदा तरी रक्तदान करायचं असा उशिराच संकल्प केला आणि वय वर्ष बावीस पासून बेचाळीस पर्यंत वर्षातून कधी एकदा तर कधी दोन वेळा असे रक्तदान करत आलो. आणि दोन वर्षा पूर्वी कोरोना सारख्या आजारपण मुळे संपूर्ण जगावर संकट आले त्या मध्ये फार मोठी हानी झाली. रक्ताची गरज आहे असे बरेच जणांनी सांगितले आणि डोळ्यांनी पहिले ,अनुभवले की रक्त तुटवडा आहे आणि रक्त मिळवण्यासाठी बरेच जण दोनशे की.मी. पर्यंत गेलेत तरी काही लोकांना हताश व्हावे लागले. आणि किती तरी लोकांना आपले प्राण गमवावे लागले. आणि मनात खूपच हळहळ वाटली आपण काय करू शकतो या साठी विचार केला आणि आमचे मित्र ब्लड बँक फलटण मधील महेंद्र गायकवाड यांनी सांगितले की पूर्ण तंदुरुस्त आणि कोणताही आजार नसेल तर आपण तीन ते चार महिन्यातून एकदा रक्तदान करू शकतो . आणि शिवाय रक्त परत चोवीस तासा मध्ये तयार होते आणि मी निश्चय केला शक्य त्यावेळी रक्तदान करेन आणि गत वर्षी स्वच्छेने वर्षात तीन वेळा रक्तदान केले आणि या वर्षी 2022 मध्ये काल रक्तदानाची 25 सावी वेळ पूर्ण झाली ….. मनातून खरंच खूप आनंद झाला की आयुष्यात खरंच योग्य वेळी पंचवीस लोकांना उपयोगी आलो ……
अशी संधी आयुष्यात या पुढे ही वारंवार मिळत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ….. मग चला आपण रक्तदान करुया आणि अनेकांना जीवनदान देऊया.
धन्यवाद ….
– विवेक गायकवाड फलटण