स्थैर्य, सातारा, दि. ०४ : महावितरण कंपनीसह ठेकेदाराच्या गलथान पणामुळे वजरोशी (ता.पाटण) येथे मालन डफळे यांचा बळी गेला आहे. याप्रकरणी पोलिस दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. मात्र, त्यानंतरही काही जणांना वाचवण्यात येत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी याप्रकरणी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.याबाबत अधीक्षक अभियंता, मुख्यमंत्री,ऊर्जा मंत्र्यांसह जिल्हाधिकारी आणि पोलिस निरीक्षक यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.शुक्रवार दि. २६ जूनला मालन डफळे यांना शेतात शॉक लागला होता. यातच त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी गुन्हा ही दाखल करण्यात आला आहे. काही जणांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे सर्व दोषींवर कारवाई होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांची डफळे कुटुंबीयांनी भेट घेतली. त्यानंतर सुशांत मोरे यांनी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यासह दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.