दैनिक स्थैर्य । दि. २९ जून २०२३ । पालघर । पालघर विभागातील सामाजिक कार्यकर्ते तसेच त्रिरत्न बुद्ध विहाराचे जेष्ठ सभासद शरद महादेव जाधव यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ६१ व्या वर्षी नुकतेच दुःखद निधन झाले.
दिवंगत शरद जाधव मनमिळाऊ, सर्वसमावेशक व हसतमुख स्वभावाचे होते, समाजातील सर्वच स्तरातील लोकांशी त्यांचे घनिष्ठ संबंध असल्याने त्यांच्या अचानक जाण्याने समाजात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पालघर पास्थळ येथील त्रिरत्न बुद्धविहार निर्मितीच्या कार्यात दिवंगत शरद जाधव यांचे मोठे योगदान होते. दिवंगत शरद जाधव यांच्या मागे त्यांची पत्नी, चार मुली, चार जावई व नातवंडे असा परिवार आहे. दिवंगत शरद जाधव यांची पुण्यानुमोदन विधी व शोकसभा त्रिरत्न बुद्ध विहार समिती यांच्या अधिपत्याखाली दि. ३० जून २०२३ रोजी सकाळी ठीक ११ वाजता त्रिरत्न बुद्ध विहार, पास्थळ येथे करण्याचे योजले आहे तरी सर्वांनी उपस्थित राहून आदर्शांस श्रद्धांजली अर्पण करावी अशी विनंती त्रिरत्न बुद्ध विहार समितीद्वारे काढण्यात आलेल्या परिपत्रकात करण्यात आली आहे.