… तर माझ्या सुसाईडला पोलीस प्रशासनच जबाबदार; लोकमतचे पत्रकार प्रशांत रणवरे यांचा WhatsApp मेसेज व्हायरल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. २१ : फलटण तालुक्यातील जिंती येथील लोकमतचे पत्रकार प्रशांत रणवरे यांना वाळू माफियांनी धमकावल्या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंतर्गत सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. सबंधित त्या वाळूमाफियांवर जर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद केला जात नसल्याने मला सुसाईड करण्याशिवाय पर्याय नाही, या सर्व प्रकाराला फलटण पोलीस प्रशासनच जबाबदार राहील, अश्या आशयाची WhatsApp पोस्ट दैनिक लोकमतचे जिंतीचे बातमीदार प्रशांत रणवरे यांनी विविध WhatsApp ग्रुपवर सेंड केलेली आहे.

काय आहे प्रशांत रणवरे यांची WhatsApp पोस्ट

मी प्रशांत रणवरे (पत्रकार) काल फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये तालुक्यातील सर्व पत्रकार गेलो असता. पोलीस अधिकारी पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा करण्यास टाळाटाळ करत असल्याने दिसून येत आहे.त्यांनी फक्त NC दाखल करून घेतली आहे. त्यामुळे, मी सुसाट करण्याशिवाय पर्यंत नाही. याला सर्वत्र फलटण फलटण डीवायएसपी बरडे,फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अधिकारी सावंत जबाबदार असतील. या फलटण तालुका कायदा सुव्यवस्था पुर्णपणे कोलमडली आहे. फलटण पोलिसांचे मत तुला मारहाण व तोडफोड होणे आवश्यक आहे. पोलीस मारहाण करण्याची वाट पाहत आहे. जिल्हा पत्रकार संघ व तालुका पत्रकार संघाचे आभार आपण जी मला साथ दिली आपले आभार आहे.

आपल्या न्रम
प्रशांत रणवरे.

पत्रकार प्रशांत रणवरे यांच्या वरील पोस्टमुळे एकच खळबळ उडाली असून या घटनेनंतर फलटण शहर व तालुका पत्रकार यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांची भेट घेतली यावेळो सर्व पत्रकार यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी मागील दोन दिवस पत्रकार प्रशांत रणवरे यांचा दखलपात्र गुन्हा करण्यासाठी टाळाटाळ केल्यामुळे ही वेळ पत्रकार यांच्यावर आणल्याची बाब निदर्शनास आणून दिली.


Back to top button
Don`t copy text!