स्थैर्य, मुंबई, दि.११: कोरोनामुळे अंतिम वर्षांच्या परीक्षा रखडल्या होत्या. अंतिम वर्षांचा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिल्यानंतर आता या परीक्षा रद्द न होणार नाहीत तर राज्यांना त्यांच्या सोयीच्या तारखांनुसार घेता येणार आहेत. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन परीक्षा घरातून कशी देता येईल यासाठी मुंबई विद्यापीठात चर्चा सुरू होती.
विद्यार्थ्यांना घराबाहेर न पडता परीक्षा घ्यायची यावर सर्व कुलगुरूंचं एकमत झालं आणि त्यासाठी MCQ पद्धतीनं परीक्षा घेण्यासंदर्भात चर्चा झाली. विद्यार्थ्यांना MCQ पेपरचा पॅटर्न लक्षात यावा यासाठी परीक्षेपूर्वी Question Bank देण्यात येणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
यासंदर्भात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्यासोबत चर्चा झाली असून परीक्षेआधी विद्यार्थ्यांना सरावासाठी Question Bank देण्यात येईल अशी माहिती ट्वीट करून उदय सामंत यांनी दिली आहे.