स्थैर्य, सातारा, दि. २१ : संपूर्ण देशात करोनाचे संकट वाढत असताना टाळेबंदी च्या काळात कमाईचे साधन हरवल्याने कुणावरही उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने जिल्ह्यात शिवभोजन योजनेतून शिवभोजन थाळी यांची संख्या वाढवली .मागील चार महिन्यात सातारा शहरात मंजूर 64 हजार 650 स्थळांपैकी 37 हजार 108 थाळ्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागात मंजूर दोन लाख तीन हजार 693 पैकी एक लाख 83 हजार 832 विक्री झाली आहे.
जिल्ह्यात एकूण दोन लाख 68 हजार 250 पैकी 2 लाख 30 हजार 940 था ल्या विक्री झाली आहे .सध्या सातारा जिल्ह्यातील 44 शिव भोजनालय यांच्या माध्यमातून लाखो गरजूना या योजनेचा लाभ मिळत आहे.
याबाबत माहिती देताना जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे _देवकाते म्हणाले की शिव भोजन योजना गरजूंना आधार ठरली आहे . करोना लॉक डाऊन च्या काळात या योजनेमुळे कष्टकऱ्यांना दिलासा मिळाला .जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेला प्रतिसाद मिळत आहे . या बाबत कोणताही गैरप्रकार निदर्शनास आल्यास संबंधित भोजनालया वर कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान सातारा जिल्ह्यात शिवभोजन थाळी मध्ये एप्रिल महिन्यात 49 हजार सहाशे, पाच मे महिन्यात 69 हजार 276, जून महिन्यात 68 हजार 868 तर जुलै महिन्यात आजपर्यंत 33 हजार 191 थाळी विक्री करण्यात आल्या.