तन्वी चाळके हिचा सत्कार करताना माजी. सरपंच शैलेंद्र शेलार शेजारी तन्वीचे वडील विजयकुमार चाळके, चुलते अनिल चाळके व इतर
स्थैर्य, कोयनानगर, दि. ३१ : ग्रामीण भागात असणारया विविध समस्यावर मात करून दहावीच्या परीक्षेत पाटण तालुक्यात उत्तुंग भरारी घेणारया कोयना विभागातील कामरगाव या गावातील सामान्य कुटुंबातील तन्वी विजय चाळके हीने 99.80 % गुण प्राप्त करून राज्याच्या गुणवत्ता यादीत टॉप टेन येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. दोनच दिवसापुर्वी चाळके कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असताना तन्वीने मिळालेल्या यशामुळे दुःखाच्या वेदना सहन करत सुखाच्या समीप गेलेल्या तन्वी व चाळके कुटुंबाच्या एका डोळ्यात आसू तर एका डोळ्यात हसु अशी अवस्था आहे.तिच्या या यशामुळे कोयना विभागाला सातारा जिल्ह्यात नाव लौकिक प्राप्त झाला आहे. दहावीत घवघवीत यश संपादन केल्यानंतर कोयना विभागात विवीध मान्यवरांच्या हस्ते सत्कार होत आहे.
साधी राहणी व उच्च विचार असणारे कोयना विभागातील कामरगाव या गावातील सर्वसामान्य असणारे चाळके कुटुंबातील तन्वी विजय चाळके हिचे पहिली ते आठवी पर्यंतचे शिक्षण कोयनानगर येथिल नेताजी सुभाषचंद्र हायस्कूल येथे झाले आहे काही कारणामुळे तिला पुढील शिक्षण पाटण येथील माने देशमुख विद्यालयात घ्यावे लागले आहे.विविध समस्या व संकटाने ग्रासलेल्या तन्वी चाळके हिने आलेल्या पर स्थितीवर मात करत दहावीच्या परीक्षेत 99.80 % गुण प्राप्त करत यशाला गवसणी घातली आहे.
निकाल जाहीर होण्या दोन दिवस अगोदर तन्वीची मोठी चुलती हिचे अकस्मात निधन झाले आहे. एकत्र कुटुंब पध्दती असणारया चाळके कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.कुटुंबांवर मोठा आघात कोसळला असताना तन्वी चाळके हिचा दहावीचा निकाल हाती आला या निकालात तन्वी चाळके हिने मोठे यश संपादन केले. यामुळे तन्वी व चाळके कुटुंबीयांच्या एका डोळ्यात आसू असताना तन्वीने राज्य पातळीवर मिळवलेल्या यशामुळे आपले दुःख मनात ठेवून त्याच्या चेह-यावर हसु आले आहे.
आपल्या या घवघवीत यशाबदल बोलताना तन्वी चाळके म्हणाली माझ्या शिक्षणासाठी कष्ट घेणा-या पालकांच्या स्वप्नांची व कुटुंबाची व परिश्रम घेणा-या शिक्षकांची माझ्या कडून स्वप्नपूर्ती झाली आहे. मला इंजीनीअर व्हायचे असून त्यासाठी माझा संघर्ष सुरु आहे.