दैनिक स्थैर्य । दि. ११ मार्च २०२२ । सातारा । प्रतापगंज पेठ, सातारा येथील स्टेट बँकेच्या शाखेकडून अर्पाटमेंट बांधकाम करण्यासाठी घेतलेले एक कोटी ७५ लाख रूपयांचे कर्ज न फेडताच बँंकेच्या परस्पर अर्पाटमेंटमधील चार फ्लॅट व दोन दुकान गाळे विकून बँकेची फसवणुक केली. याप्रकरणी बँकेचे कर्मचारी विवेक कुमार सिन्ह रा. भंडारी एजन्सी, देगाव फाटा यांनी फिर्याद दिली. यानंतर रोहन बाळासाहेब वाघमारे रा. अझादनगर,मोळाचा ओढा सातारा याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत शाहूपुरी पोलिस स्टेशनमधून देण्यात आलेली माहिती अशी, रोहन वाघमारे याचा बांधकाम व्यवसाय आहे. त्याने मंगळवार पेठ परिसरात रोहन हाईट्स नावाचे अर्पाटमेंट बांधण्यासाठी स्टेट बँंकेच्या प्रतापगंज पेठ शाखेतून एक कोटी ७५ लाख रूपयांचे कर्ज २0१५ मध्ये घेतले होते. हे घेताना वाघमारे याने रोहन हाईट्स अर्पाटमेंटमध्ये चार फ्लॅट व दोन दुकान गाळे बांधणार असल्याचे सांगून तशी कागदपत्रे बँकेला दिली होती. त्यानंतर वाघमारे याने २0१८ सालापर्यंत कर्जाच्या रकमेपोटी येणारे हप्ते भरले होते. मात्र, २0१९ पासून वाघमारे याने बँॅंकेला हप्ते देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर बँकेने त्याला वेळोवेळी थकीत कर्जाच्या रकमेबाबात मागणी केली असता, त्याने ती भरण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर बँंकेच्या अधिकाऱ्यांनी पुढील कार्यवाहीसाठी रोहन अर्पाटमेंट या वास्तूची पाहणी केली असता वाघमारे याने तिथे काढलेले चार फ्लॅट व दोन दुकान गाळ्यांऐवजी काढलेले फ्लॅट बँंकेच्या परस्पर विकल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर वरिष्ठ कार्यालयाशी पत्र व्यवहार करून दि.९ रोजी सिन्हा यांनी रोहन वाघमारे याच्याविरोधात फसवणुकीची फिर्याद दिली आहे.