दैनिक स्थैर्य | दि. २७ सप्टेंबर २०२३ | फलटण |
मुधोजी महाविद्यालयामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अभ्यास केंद्राचे ‘शॉर्ट टर्म’ कोर्सेस सुरू करण्यात आलेले आहेत. तीन ते सहा महिन्यांचे कोर्सेस पाचशे ते एक हजार रुपयांमध्ये शिकवले जाणार आहेत. कोर्स पूर्ण केल्यानंतर शिवाजी विद्यापीठाकडून सर्टिफिकेट मिळते.
हे कोर्स विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार व नोकरीसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. त्यासाठी किमान दहावी अथवा बारावी उत्तीर्ण ही पात्रता असते. तरी इच्छुकांनी, पीसी मेंटेनन्स, टॅली, ट्रॅव्हल्स अँड टुरिझम या कोर्सेस साठी त्वरित प्रवेश घ्यावा व त्यासाठी प्राध्यापक मदन पाडवी यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी केले आहे.
४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)