आणखी सोळा जण झाले कोरोना मुक्त; आज दिवसभरात 35 रुग्णांना सोडले घरी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


219 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पाठविले तपासणीसाठी

स्थैर्य, सातारा दि. 1 : क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण सरुग्णालय, सातारा  येथे दाखल असणारे 5, सह्याद्री हॉस्पिटल येथील 5, कोविड सेंटर रायगांव येथील 2 व खावली येथील 4 असे एकूण  16  कोरोना बाधित रुग्ण आज पूर्णपणे बरे झाले असून त्यांना  घरी सोडण्यात आले आहे. कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथून आज 19 जणांना घरी सोडण्यात आले होते. त्यामुळे आज दिवसभरात एकूण  35 कोरोना बाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

219जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पाठविले तपासणीसाठी

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे  17,  वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथे 52, कृष्णा कॉजेल कराड येथे 42, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे 14, ग्रामीण रुग्णालय वाई येथे 6, ग्रामीण रुग्णालय खंडाळा येथे 29, ग्रामीण रुग्णालय कोरेगांव येथे 33 व रायगाव येथे 26  असे एकूण 219 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने  एन.सी. सी. एस. पुणे व कृष्णा मेडिकल यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यामध्ये आज तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 3 मृत व्यक्तिंच्या घशातील स्त्रावांचाही  समावेश असल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!