स्थैर्य, दापोली, दि.१८: रत्नागिरी जिल्ह्यातील
दापोलीमधील आंजर्ले बीचवर शुक्रवारी पोहण्यासाठी गेलेले पुण्यातील 6 तरुण
बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान, स्थानिकांनी या सहापैकी
तिघांना वाचवले असून, तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेची
माहिती मिळताच दापोली पोलीस घटनास्थळ दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे .
पोहताना लाटेसोबत समुद्रात बुडाले
दापोली
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निहाल चव्हाण,अक्षय राखेलकर, उब्स
खान, रोहित पलांडे, विकास श्रीवास्तव आणि मनोज गावंडेसह 14 पर्यटक
पिकनिकसाठी पुण्यातून आले होते. शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास
समुद्रात पोहताना एक मोठी लाट आली आणि सहा जणांना आपल्या सोबत घेऊन गेली.
यावेळी स्थानिकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. यातील तिघांना
वाचवण्यात यश आले, तर तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.