दैनिक स्थैर्य । दि. २२ फेब्रुवारी २०२२ । सातारा । सातारा तालुक्यातील चिंचणेर निंब गावच्या हद्दीत गर्दी करून मारामारी केली. याप्रकरणी तेथीलच सहा जणांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
याबाबत सातारा तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १९ रोजी २.३५ ते ३ वाजण्याच्या सुमारास चिंचणेर निंब येथील विशाल मारुती कुमठे, वय २१ याला राहत्या घराच्या समोर तसेच तेथीलच न्यू इंग्लिश स्कूलच्या ग्राउंडवर अक्षय अनिल पवार याने काल माझ्या भावाच्या अंगावर कोण कोण गेले होतं असे विचारले. तेवढ्यात तिथे सागर अनिल पवार हा आला. त्या दोघांनीही विशाल याला मारहाण केली. तसेच रोहित संजय पवार, राहुल संजय पवार, परशुराम अनिल पवार, आकाश मारुती पवार या सर्वांनी विशाल कुमठे याच्या चुलत बहिणीचे पती प्रकाश राजाराम चव्हाण यांना मारहाण करण्यात आले.