दैनिक स्थैर्य । दि. ०१ मार्च २०२२ । बारामती । जळोची येथील जोशी समाज्याच्या जमिनी बाबत बारामती वनविभाग येथे ठिय्या आंदोलन समस्त जोशी समाज जळोची यांचे वतीने, वन विभागाच बारामती कार्यालया बाहेर ठिय्या आंदोलन चालु, गाव मौजे कन्हेरी गट नं 293 मधे, किशोर हंसराज पाचंगे यांचे आजोबा यांना तत्कालिन तहसीलदार रातुगटकळ यांनी 1978 साली भूमिहीन लोकांना जमीन देऊ केली होती त्यामधे दोन हेक्टर जमीन पाचंगे यांना देखील दिली होती. तसा जमीन दिलेला आदेश देखील आहे.
सात बारा (7/12) दफ्तरी किशोरहंसराज पाचंगे यांची नोंद देखील आहे. बारामती येथील वन विभागाच्या अधीकारी यांनी कोणतीही लेखी आथवा तोंडी नोटीस न देता, वनविभागाचा फौज फटा घेऊन दमदाटी करून, संपुर्ण जमीनी मधील उभा असलेल्या उसाचे पीक व ठिबक सिंचन नेस्तनाबूद करून टाकले, व सदर जमीनीचा ताबा घेतला,त्यासंदर्भात तत्कालिन वनपरिक्षेत्र अधिकारी काळे यांना भेटुन विचारणा केली असता त्यांनी फक्त वेळ काढु पणा केला.
जवळपास 6 महीने या गोर गरीब सामाजातील भटकंती करून जगणाऱ्या समाजाला झुलवत ठेवले. बेकायदेशीर जमीनीचा ताबा घेतला असून, आज रोजी त्यांच्या कार्यालया बाहेर ठिय्या आंदोलन घेण्यात आले. जमीन लवकरात लवकर परत करावी व केलेली नुकसानभरपाई द्यावी. अन्यथा या ठिय्या आंदोलनाचे स्वरूप बदलून आमरण उपोषणात होईल का ? आत्मदहनात होईल हे सांगु शकत नाही.
या ठिकाणी बसुन उपाशी मरण्यापेक्षा आम्ही आम्हदहन करू असा इशारा अँड. अमोल सातकर यांनी दिला. या वेळी राष्ट्रवादीचे युवक प्रदेश अध्यक्ष किशोर मासाळ, प्रताप पागळे, नवनाथ मलगुंडे, शैलेश बगाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.